शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी गजाआड; १५ गुन्हे केल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:43 IST

गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, श्रेयनगर, उस्मानपुरा, वाळूज एमआयडीसी आदी १६ ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या.

ठळक मुद्दे २१ किलो चंदनासह २ लाखांचा ऐवज हस्तगतचंदनचोर नागरिकांना न जुमानता ते त्यांच्यासमोर झाड तोडून नेत.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या चंदन तस्करांच्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावर बेड्या घातल्या. या टोळीकडून २१ किलो चंदनाचे लाकूड, दोन मोटारसायकली, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गौसखान महेमूद खान (६०,रा. फाजलवाडी, ता.फुलंब्री),अनिस खान अयुब खान (२१, रा. आडगाव माहुली), नय्युम अयुब पठाण(२६, रा. फाजलवाडी), नसेव्ब खान अली खान (२४, रा. आडगांव) आणि सलीम मोहम्मद खान (२६, रा.फाजलवाडी )अशी अटकेतील चंदनतस्करांची नावे आहेत.

गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, श्रेयनगर, उस्मानपुरा, वाळूज एमआयडीसी आदी १६ ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या. चंदनचोर नागरिकांना न जुमानता ते त्यांच्यासमोर झाड तोडून नेत. हे तस्कर सशस्त्र असतात. यामुळे नागरिक त्यांचा सामना करण्यास धजावत नसत. शिवाय रात्री पोलिसांची गस्त तुरळक असते. ही बाब हेरून चंदनतस्करांनी दोन वर्षांपासून उच्छाद मांडला होता. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यांनी चंदनचोरांना पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. 

सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख हे या टोळीच्या मागावर होते. रात्री ही टोळी चोरीचे चंदन विक्री करण्यासाठी सावंगी ते केंब्रिज चौक रस्त्याने जाणार असल्याची गुप्त माहिती, खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, दीपक देशमुख, ओमप्रकाश बनकर, नितीन देशमुख,धर्मराज गायकवाड, बबन इप्पर, अविनाश थोरे आणि महिला कॉन्स्टेबल मोहिनी चिंचोळकर यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर सावंगी बायपासवरील नारेगाव चौफुलीवर सापळा रचला. यावेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अडवले असता पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याजवळील गोणपाटात २१ किलो चंदनाचे तीन तुकडे आढळून आले.

शहरातील १५ गुन्ह्यांची कबुलीगुन्हे शाखेने मुसक्या आवळल्यावर या टोळीला पोलीस आयुक्तालयात नेले. तेथे त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी शहरातील जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, वाळूज एमआयडीसी, छावणी कार्यालय परिसर, क्राईस्ट चर्च छावणी, चिकलठाणा एसटी कार्यशाळा, श्रेयनगर, उस्मानपुरा,कडा कार्यालय परिसर,समर्थनगर,पुष्पनगरी, सिडको एन ३, सुवर्णपेढी समोर, मुकुंदवाडी गाव, विद्युत कॉलनी, नाथ व्हॅली शाळेमागील कॉलनीत, हडको एन ११,आयडिया कॉल सेंटर, महावीर चौक परिसर,फुलंब्री , कन्नड आणि जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे चंदन चोरी केल्याची कबूल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस