शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

ओलिस ठेवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नव्याने निष्पन्न आराेपी अद्यापही मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:09 IST

लोकमत इम्पॅक्ट : कसूर केल्याचा ठपका, फौजदार निलंबित

छत्रपती संभाजीनगर : सोळा वर्षीय शाळकरी मुलीचे एका महिलेने अपहरण करून तीन दिवस तिला ओलीस ठेवत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केले होते. या गुन्ह्याच्या नव्याने झालेल्या तपासात चार आरोपी निष्पन्न झाले. मात्र, अद्यापही पोलिसांना या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावता आलेला नाही.

सप्टेंबर २०२४ मध्ये या मुलीवर नाशिक व धुळ्यात पाच जणांकडून पाशवी अत्याचार करण्यात आले. यात छावणी पोलिसांनी प्राथमिक जयश्री अशोक सोनवणे (रा. संगमनेर, अहिल्यानगर) व जयपाल प्रकाश गिरासे (३५, रा. शिरपूर, जि. धुळे) यांना आरोपी केले. मात्र, पीडितेने सामूहिक अत्याचार झाल्याचे सांगूनही दुर्लक्ष करण्यात आले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या गुन्ह्याची ‘फाइल रि-ओपन’ करून नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. 'लोकमत'ने याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करून हे प्रकरण उघडकीस आणले होते.

वरिष्ठांना सूट, कनिष्ठांवर कारवाईतपासात कसूर केल्याचा ठपका ठेवत उपनिरीक्षक नरळे यांना निलंबित करण्यात आल्याचे उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी स्पष्ट केेले. मात्र, पोक्सोच्या तपासात वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची असते. नियमाने पोक्सो गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची वरिष्ठ समितीमार्फत छाननी होते. छावणीच्या प्रकरणात हे कोणाकडूनच गांभीर्याने घेतले गेले नाही. वरिष्ठांनी यात लक्ष का घातले नाही, दोषारोपपत्रात चुका निदर्शनास का आणून दिल्या नाहीत, हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत.

आराेपी काही मिळेनापोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, पीडितेवर हाजी इस्माइल अन्सारी (रा. सेंधवा, मध्य प्रदेश), शिवनाथ योगी (रा. डेगाना, राजस्थान) व हाजीच्या एक साथीदाराने अत्याचार केल्याचे नव्याने निष्पन्न झाले. मात्र, पथक त्यांचा अद्यापही तपास लावू शकलेले नाही. यापूर्वी पथक राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परत आले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPOCSO Actपॉक्सो कायदा