कामगार अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 01:30 IST2016-04-18T01:21:28+5:302016-04-18T01:30:28+5:30
औरंगाबाद : ‘लेबर कॉन्ट्रॅक्टरशिप’चा परवाना देतो, असे आमिष दाखवून कामगार अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केला.

कामगार अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
औरंगाबाद : ‘लेबर कॉन्ट्रॅक्टरशिप’चा परवाना देतो, असे आमिष दाखवून कामगार अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी शनिवारी (दि.१६) मध्यरात्रीनंतर जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जिन्सी ठाण्यातील पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय काजे (५०) असे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सध्या येवला येथे कार्यरत आहे. आरोपी विजय काजे हा २०१३ मध्ये औरंगाबाद येथे कामगार अधिकारी म्हणून कार्यरत होता. काजे याने ‘तुझा अर्ज मी मान्य करून देतो’, असे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. विशेष म्हणजे त्यानंतर काजे याने महिलेला विविध ठिकाणी नेऊन तिचे शोषण केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांची उडवाउडवी
शनिवारी मध्यरात्री कामगार अधिकारी विजय काजे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. अधिकारीही महिलांचे शोषण करीत असल्याचे उघड झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ऊहापोह झाला. दाखल गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्याशी दिवसभरात अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली नाही. महासंचालकांचे माहिती न देण्यासंबंधी आदेश असल्याचे सांगून असमर्थता दर्शविली.