वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील माउलीनगरात चोरट्यांनी ऐतिहासिक आणि दुर्मीळ नाण्यांवर डल्ला मारत मोठी चोरी केली. डॉ. मोनिका मुथा यांच्या घरातून हा मौल्यवान ऐवज चोरीस गेला असून त्याची किंमत लाखो रुपयांत आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रियंका मुथा यांच्या वडिलांना सुरुवातीपासूनच दुर्मीळ नोटा व चलन जमा करण्याची आवड होती. तसेच त्यांचा जुनी नाणी व नोटा खरेदी-विक्री करण्याचा व्यावसाय होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून कुटुंबाने हा ठेवा जतन करून ठेवला होता. दि. १५ मार्च ते १७ मार्च या कालावधीत सहकुटुंब राजस्थानात देवीच्या दर्शनासाठी गेले होते, १७ मार्च रोजी घरी आल्यानंतर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरातील जुनी नाणी, चांदीची नाणी व नोटा तसेच इतर वस्तू गायब होत्या. तारादेवी मुथा यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली.
चोरी झालेल्या साहित्यामध्ये कानातील सोन्याच्या रिंग, रोख सहा हजार रुपये, आरबीआय गव्हर्नर अय्यंगर बॉम्बे मिंटचा सेट, (५रु., १० रु.,१०० रु. व १००० रु. च्या नोटा), आरबीआय गव्हर्नर एप्स. जगन्नाथन् बॉम्बे मिट (१०० च्या १० नोटा), आरबीआय गव्हर्नर नरसिम्ह राय बॉम्बे मिट (१०० च्या १० नोटा), आरबीआय गव्हर्नर बी. रामाराव बॉम्बे मिट (१०० च्या १० नोटा), १ रु. २ रु. ५ रु. च्या नोटांचा प्रत्येकी एक एक सेट, १ ते १००० रु. पर्यंतच्या जुन्या भारतीय चलनी नोटा सेट (अंदाजे ५००-६०० नोटा), १९७० चा १ रु.चे वॉईन ५ नग, १९५४ चे १ रु.चे कॉईन ५ नग, १९३९ चा १ रु.चे वॉईन १० नग, अकबरचे कॉईन १० नग, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ताजवाली राणी सेट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चोटीवाली राणी रोट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अडवर्ड सेट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कपनी पंचम् जॉर्ज सेंट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सिक्स्थ जॉर्ज सेंट, मिक्स सिल्वर कॉईन्स २५० नग असा एकूण अंदाजे १०-१५ लाख रुपयांपर्यंतचा मुद्देमाल लंपास केल्याचा अंदाज आहे. फौजदार संदीप काळे हे करीत आहेत.