दरोडेखोरांची टोळी वर्षासाठी हद्दपार

By Admin | Updated: October 1, 2016 01:22 IST2016-10-01T00:47:02+5:302016-10-01T01:22:09+5:30

बीड : जिल्ह्यात दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अधीक्षक अनिल पारसकर यांनी शुक्रवारी एका वर्षासाठी हद्दपार केले.

Gang of dacoits for years | दरोडेखोरांची टोळी वर्षासाठी हद्दपार

दरोडेखोरांची टोळी वर्षासाठी हद्दपार


बीड : जिल्ह्यात दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अधीक्षक अनिल पारसकर यांनी शुक्रवारी एका वर्षासाठी हद्दपार केले.
शेख अश्पाक शेख आसेफ (रा. मोहम्मदिया कॉलनी) असे म्होरक्याचे नाव आहे. आगामीर खान उर्फ लंगडा लाला जहाँगीरखाँ पठाण (रा. ढगे कॉलनी, बार्शी नाका), सय्यद मजहर सय्यद अख्तर, सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (दोघेही रा. मोहम्मदिया कॉलनी), शेख बशीर शेख बनेमियाँ (रा. गांधीनगर) यांचा टोळीत समावेश आहे. २००५ ते २०१६ या कालावधीत त्यांनी ११ गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध हद्दपारीचा बडगा उगारण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Gang of dacoits for years