गँगरेप प्रकरण : दोघांना कोठडी
By Admin | Updated: July 7, 2014 00:14 IST2014-07-06T23:25:07+5:302014-07-07T00:14:14+5:30
कळंब : महिलेवर सामूहिक बलात्कार करीत डांबून ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़

गँगरेप प्रकरण : दोघांना कोठडी
कळंब : महिलेवर सामूहिक बलात्कार करीत डांबून ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत़
पोलिसांनी सांगितले की, भाटशिरपुरा येथील एक २३ वर्षीय महिला १ जुलै रोजी सकाळी शेळ्या चारण्यासाठी गावच्या शिवारातील शेतात गेली होती़ गावच्या शिवारातील शेतात शेळ्या चारत असताना सायंकाळच्या सुमारास तेथे अण्णा दत्तू गायकवाड, तुषार भागवत झोंबाडे, लहू पापा शिंदे (सर्व रा़भाटशिरपुरा ताक़ळंब) हे तेथे आले़ यातील तुषार झोंबाडे, लहू शिंदे, अण्णा गायकवाड या तिघांनी तिला उचलून आडोशाला नेले़ तद्नंतर यातील अण्णा दत्तू गायकवाड याने त्या महिलेवर बलात्कार केला़ यानंतर तिस कारमध्ये घालून मांगवडगाव, सोनीजवळा (जि़बीड) या गावात दोन दिवस डांबून ठेवले़ याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अण्णा दत्तू गायकवाड, तुषार भागवत झोंबाडे, लहू पापा शिंदे व कारचालक संपत थोरात (सर्व रा़भाटशिरपुरा) या चौघाविरूध्द शुक्रवारी रात्री शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अटकेतील लहू शिंदे, संपत थोरात यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तर इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत़ पुढील तपास सपोनि संभाजी पवार करीत आहेत़ (वार्ताहर)