शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

लोणीचे गणपती हैदराबादच्या बाजारात

By admin | Updated: July 30, 2014 00:49 IST

नितीन कांबळे, कडा एकीकडे गणरायाच्या भक्तांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचीही लगबग वाढली आहे.

नितीन कांबळे, कडाएकीकडे गणरायाच्या भक्तांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचीही लगबग वाढली आहे. आष्टी तालुक्यातील लोणी येथील मूर्तीकार संतोष शिंदे यांनी बनविलेल्या मूर्र्तींना तर आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे मागणी आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी २०० पेक्षा अधिक मूर्ती हैदराबाद येथील बाजारात पाठविल्या आहेत. गेल्या काही वर्षात देशातील कानाकोपऱ्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होऊ लागली आहे. गणरायाच्या भक्तांना ही तर पर्वणीच असते. शिवाय गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेक व्यावसायिकांचीही चलती असते. लोणी येथील कुंभार समाजातील पांडुरंग शिंदे हे १९८८ पासून मनमोहक गणरायाच्या मूृर्ती बनवितात. त्यांची ही कला त्यांचा मुलगा संतोष शिंदे व सून संगीता यांनी अवगत केली आहे. संतोष व संगीता यांनी आपल्या कलेला अधिकच पैलू पाडले. यासाठी त्यांना कचरू राजापुरे यांचेही मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्यांच्या कलेचा गवगवा आता परराज्यातही दुमदुमू लागला आहे.संतोष व संगीता गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस गणरायांच्या सुबक मूर्ती तयार करतात. त्यांना साजेसे रंगही देऊन मूर्तीमध्ये जीव आणतात. पाच इंचापासून ते पाच फुटांपर्यंत उंची असलेल्या मूर्ती शिंदे दाम्पत्य बनवितात. या मूर्ती अतिशय देखण्या असल्याने त्यांना विविध गणेश मंडळांकडून मागणी असते. दगडूशेठ, सावकार, लालबाग, मद्रास, दहिहंडी, साईबाबा, बालगणेश , अष्टविनायक, शंख, मंगलमूर्ती, कमळ, लोड सावकार, पद्मासन, गौरी- गणपती, जास्वंद, सिंह प्रबळ अशा ६७ आकारातील विविध गणेशमूर्ती बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. या मूर्र्तींना हैदराबाद येथेही चांगली मागणी आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक मूर्ती तेथे पाठविल्या आहेत.