शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:41 IST

फुलंब्रीत पोखरी तलावावर मुलाला वाचविले, पण पित्याचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर /फुलंब्री : पिता-पुत्र गणपती विसर्जनासाठी पोखरी तलावावर गेले होते. बाप्पाला निरोप दिल्यानंतर पोहण्यासाठी तलावात उतरले. मुलाचा पाय घसरून तो तलावात पडला. त्याला वडिलांनी वाचवले. मात्र, त्यांचाच पाय घसरून ते खोल पाण्यात बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना काढून एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सुधीर काशिनाथ मेणे (४८, रा. श्रीरामपूर, ह. मु पोखरी), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मेने हे घाटीत रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत. शनिवारी गणपती विसर्जनासाठी ११ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन ते पोखरी तलावात गेले. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर तलावात पोहण्यासाठी उतरले. मुलगा तलावाजवळ उभा होता. त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. सुधीर यांनी मुलाला तत्काळ पाण्याबाहेर काढले; पण त्याच वेळी त्यांचा पाय घसरला. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने ते पाण्यात बुडाले. रात्री उशिरा पोखरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधीर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद आधी सिडको पोलिस ठाण्यात व नंतर फुलंब्री पोलिस ठाण्यात करण्यात पोनि. संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलाश राठोड हे पुढील तपास करीत आहेत.

देगलूरात तरुणाचा बुडून मृत्यूदेगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील देगाव बु. येथे माधव पुंडलिक हनुमाने (२५) या तरुणाचा विसर्जनावेळी लेंडी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना विसर्जनावेळी सायंकाळी ७ वाजता भायेगाव रोडवर घडली. माधव हा दोन सहकाऱ्यांसोबत पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही बुडू लागले. त्यापैकी दोघांना पोहता येत असल्यामुळे ते जीव वाचवण्यात यशस्वी झाले. माधव याला पोहता येत नसल्याने तो वाहून गेला. रात्री ११ वाजता काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. माधव हनुमाने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

विसर्जनावेळी दोघे गेले वाहूननांदेड शहरानजीक गाडेगाव शिवारात विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात उतरलेले दोन तरुण वाहून गेले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर एनडीआरफच्या पथकाने शोध घेऊन या तरुणांचा शोध लागला नव्हता. बालाजी उबाळे, योगेश उबाळे आणि शैलेश उबाळे हे विसर्जनासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघे जण पाण्यात वाहून जात होते. त्याच वेळी शैलेश उबाळे याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले, तर बालाजी आणि योगेश हे दोघे वाहून गेले.

गोदापात्रात पडलेल्या युवकाला वाचविलेशनिवारी रात्री विसर्जन सुरू असताना जुने कायगावच्या गोदावरी नदीच्या नवीन पुलावरून एक भक्त पाय घसरून पडला. स्थानिक जीवनरक्षक दलाचे सदस्य, गंगापूर न.प.च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचे प्राण वाचविले. गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथून आलेल्या कैलास पोपट खेडकर यांचा पाय घसरून ते गोदापात्रात पडले. स्थानिक जीवनरक्षक दलाचे सदस्य, गंगापूर नगर परिषदेची बोट, प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचाऱ्यांनी बोट त्या दिशेने तातडीने नेली. अंधारात बॅटरीच्या मदतीने सदर व्यक्तीला सुखरूप पाण्याबाहेर काढले.

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनMarathwadaमराठवाडाDeathमृत्यू