गणेश मंडळांची परवानगी आॅनलाइनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:28 IST2017-08-09T00:28:58+5:302017-08-09T00:28:58+5:30
सार्वजनिक गणेश मंडळांना धर्मदाय सहआयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागते. मागील वर्षापासूनही परवानगी आॅनलाइन करण्यात आली आहे.

गणेश मंडळांची परवानगी आॅनलाइनच
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सार्वजनिक गणेश मंडळांना धर्मदाय सहआयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागते. मागील वर्षापासूनही परवानगी आॅनलाइन करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षी ही प्रक्रिया अयशस्वी ठरली होती. मात्र, आता सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले असून, यंदा सर्व मंडळांना आॅनलाइनच अर्ज भरावा लागणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी घेण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जायची गरज नाही. कारण धर्मादायच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात लहान-मोठी तीन हजारांपेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मागील वर्षी सुमारे ५०० गणेश मंडळांना आॅनलाइन परवानगी मिळाली होती. मात्र, नंतर तांत्रिक अडचणीमुळे आॅनलाइन पद्धत अयशस्वी ठरली. परिणामी, २००० ते २५००० अर्ज आॅफलाइन भरून घ्यावे लागले. यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली होती; पण आता विभागाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष आॅनलाइन प्रक्रियेला सुरुवात झाली. ८ रोजीपर्यंत जिल्ह्यातील १० सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी केली होती. धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे.