गणेश मंडळांची प्रबोधनाची चळवळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:18 IST2016-08-28T00:09:53+5:302016-08-28T00:18:22+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्हाभरातील बहुतांश गणेश मंडळांकडून यंदाच्या गणेशोत्सव काळात समाज प्रबोधनांच्या देखाव्यावर भर दिला जाणार आहे

गणेश मंडळांची प्रबोधनाची चळवळ !
राजकुमार जोंधळे , लातूर
शहरासह जिल्हाभरातील बहुतांश गणेश मंडळांकडून यंदाच्या गणेशोत्सव काळात समाज प्रबोधनांच्या देखाव्यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती आणि जलयुक्त शिवार या विषयांना मंडळांकडून प्राधान्य दिले जाणार आहे. या देखाव्यांची गणेश मंडळांमध्ये विशेष स्पर्धा आहे. विद्युत रोषणाईबरोबरच देखाव्यांवर मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो.
गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येवून ठेपला आहे. आता सर्वच गणेश मंडळांची लगीनघाई सुरु झाली आहे. आपल्या गणेश मंडळांचा देखावा अधिक आकर्षक आणि प्रभाव पाडणारा असावा. यासाठी सर्वच मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर देखाव्यांवर काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर मोठ्या गणेश मंडळांचे डेकोरेशन आणि पेन्डॉलचे कामही गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु आहे. देखाव्यांबरोबरच आकर्षक सजावटीलाही या मंडळांकडून विशेष महत्त्व दिले जाणार आहे. या प्रबोधनात्मक देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़