भूमिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:02 IST2021-02-06T04:02:56+5:302021-02-06T04:02:56+5:30

दि. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवे भूमिजन साहित्य संमेलन ऑनलाइन पद्धतीने घेतले ...

Ganesh Devi as the President of Bhumijan Sahitya Sammelan | भूमिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश देवी

भूमिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश देवी

दि. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवे भूमिजन साहित्य संमेलन ऑनलाइन पद्धतीने घेतले जाईल. भाषेच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या डॉ. गणेश देवींसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंताची भूमिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे व डॉ. राजन गवस यांच्यासारख्या साहित्यक्षेत्रातील प्रथितयशप्राप्त ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते पाचव्या भूमिजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणे, ही सकल भूमिजनांच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी बाब असल्याचे डॉ. जिगे पाटील यांनी सांगितले.

याविषयी झालेल्या बैठकीत डॉ. जिगे पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी हुसे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. श्याम मुंडे, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. दत्तात्रय डुंबरे, प्रा. चंद्रज्योती भंडारी, डॉ. गजानन जाधव, डॉ. प्रेमला मुखेडकर, डॉ. महेश खरात, डॉ. सुखदेव पोटदुखे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Ganesh Devi as the President of Bhumijan Sahitya Sammelan