उदगीरच्या सभापतीपदी गंभीरे, उपसभापतीपदी बेंबडे
By Admin | Updated: March 14, 2017 23:52 IST2017-03-14T23:51:15+5:302017-03-14T23:52:47+5:30
उदगीर : उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी बिनविरोध झाली़

उदगीरच्या सभापतीपदी गंभीरे, उपसभापतीपदी बेंबडे
उदगीर : उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी बिनविरोध झाली़ भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही दोन्ही भाजपकडे राहिली़ सभापतीपदी देवर्जन गणातून निवडून आलेल्या सत्यकला गंभीरे तर उपसभापतीपदी कुमठा खु़ गणातून निवडून आलेले रामदास बेंबडे यांची वर्णी लागली आहे़
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने उदगीर पंचायत समिती ही काँग्रेसच्या ताब्यातून आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले़ १४ सदस्यांपैकी ९ सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत़ तर काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस १ व शिवसेना १ असे बलाबल आहे़ मंगळवारी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी डॉ़अरविंद लोखंडे यांच्यामार्फत पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली़ सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास जि़प़ सदस्य राहूल केंद्रे, शंकर रोडगे व अन्य पदाधिकाऱ्यांसह भाजपकडून सभापती पदासाठी सत्यकला गंभीरे तर उपसभापती पदासाठी रामदास बेंबडे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले़ त्यानंतर काँग्रेसकडून सभापती पदासाठी तृप्ती धुप्पे तर उपसभापती पदासाठी बाळासाहेब मरलापल्ले यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले़ दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवारांनी निवड बैैठकीपूर्वीच आपली नामनिर्देशने काढून घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली़ सभापतीपदी सत्यकला गंभीरे यांची तर उपसभापती पदी रामदास बेंबडे यांची निवड झाल्याचे पीठासन अधिकारी लोखंडे यांनी जाहीर केले़