पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ
By Admin | Updated: June 29, 2015 00:36 IST2015-06-29T00:36:04+5:302015-06-29T00:36:04+5:30
औरंगाबाद : गेल्या साठ वर्षांपासून चुकीचा इतिहास माथी मारला जात आहे. अशात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या

पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ
औरंगाबाद : गेल्या साठ वर्षांपासून चुकीचा इतिहास माथी मारला जात आहे. अशात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन शासन त्या विचारांचे समर्थन करीत आहे. यातून विकृत इतिहास जगासमोर येणार आहे. हा पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहे. त्यामुळे याविरुद्ध पेटून उठावे लागणार आहे. त्यासाठी विचारांचा वणवा पेटवावा लागेल, असे प्रतिपादन आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज बदनामीविरोधी कृती समितीतर्फे रविवारी एमजीएम येथील रुक्मिणी हॉल येथे आयोजित केलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत ते बोलत होते. परिषदेचे उद््घाटन आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी पत्रकार ज्ञानेश महाराव यांची उपस्थिती होती. यावेळी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, इतिहासकार डॉ. जाकीर पठाण, पत्रकार रवींद्र तहकीक, प्रा. प्रदीप सोळुंके, प्रा. प्रतिभा परदेशी, निलेश राऊत आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सर्वाधिक खड्डे औरंगाबादेत
बोलता बोलता औरंगाबादला जेवढे खड्डे आहेत, तेवढे महाराष्ट्रात क ोठेही नाहीत, असा उल्लेख आव्हाडांनी केला. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देऊन तर दाखवा, या आशयाचे पत्र सरकारला लिहावे, असेही आव्हाड उपस्थितांना म्हणाले.
संस्कृतीवर घाला
यावेळी उद््घाटक आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर म्हणाले, जे काही चालू आहे, ते मनाला वेदना देणारे आहे.
पुरंदरे यांना पुरस्कार देणे म्हणजे एक प्रकारे संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमात गोरखनाथ राठोड, मंजीत कोळेकर, राजकुमार गाजरे, विजय काकडे, रमेश गायवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.