जुगारावर छापा, दोन लाखांचा ऐवज जप्त

By Admin | Updated: July 9, 2017 00:16 IST2017-07-09T00:16:00+5:302017-07-09T00:16:00+5:30

नायगाव बाजार : मांजरमच्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी छापा मारुन नगदी रकमेसह दोन लाखांचा ऐवज जप्त केला.

Gambling seized, two lakhs of money seized | जुगारावर छापा, दोन लाखांचा ऐवज जप्त

जुगारावर छापा, दोन लाखांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव बाजार : मांजरमच्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी छापा मारुन नगदी रकमेसह दोन लाखांचा ऐवज जप्त केला.
मांजरमपासून काही अंतरावरील माळावर रावसाहेब मांजरमकर यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांना मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फौजफाट्यासह जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना नऊ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून २० हजार नगदी रक्कम, तीन मोटारसायकल, ८ मोबाईल असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा माल व जुगार खेळणारे रामकिशन विजघरे (रा. सावरखेड), मारोती दिगंबर (रा. धनज), संतोष शिंदे, अच्युत शिंदे, व्यंकट शिंदे,मारोती शिंदे, सुभाष शिंदे, गोविंद शिंदे, विजय शिंदे (सर्व रा. मांजरम) यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा नोंदवून सर्वांना अटक केली. याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी खांबे यांच्यासोबत वाचक सपोनि बी. पी. कोळी व त्यांचे कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Web Title: Gambling seized, two lakhs of money seized