ग्रामपंचायतीसमोर जुगार; सात जणांना पकडले
By Admin | Updated: April 23, 2015 00:44 IST2015-04-23T00:36:42+5:302015-04-23T00:44:43+5:30
जालना : भोकरदन तालुक्यातील मौजे हिसोडा येथील ग्रामपंचायतीसमोरच झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना पारध पोलिसांनी सात जणांना रंगेहाथ पकडले.

ग्रामपंचायतीसमोर जुगार; सात जणांना पकडले
जालना : भोकरदन तालुक्यातील मौजे हिसोडा येथील ग्रामपंचायतीसमोरच झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना पारध पोलिसांनी सात जणांना रंगेहाथ पकडले. ही घटना २२ एप्रिल रोजी दुपारी घडली.
आरोपी आण्णाराव रामराव सुलताने रा. वडोद तांगडा व त्यांचे सहकारी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याची माहिती कळताच पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरील ठिकाणी छापा मारुन सातही आरोपींना अटक केले. याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक बोराडे हे करीत आहेत.
दुचाकी चोरीस : येथील प्रितीसुधानगर भागातील रहिवाशी निरज गुलाब चंदन यांच्या मालकीची मोटारसायकल (क्र.एमएच-२१-के-२५८१) २१ एप्रिल रोजी शहरातील जयश्री हॉस्पिटलसमोरुन चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
लाथा-बुक्याने मारहाण : जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शिला अंकुश धानुरे या महिलेस गावातील विजय साहेबराव सोळुंके याने शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. सदर महिला किराणा सामान उधार मागण्याच्या निमित्ताने तेथे गेली होती. आरोपीने याच कारणावरुन तिला शिवीगाळ केली व लाथाबुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरुन तालुका जालना पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चेपटे हे करीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.