गणेश मंडळात जुगार अड्डा; आठ अटकेत
By Admin | Updated: September 4, 2014 01:22 IST2014-09-04T00:48:04+5:302014-09-04T01:22:54+5:30
जालना : शहरातील हनुमान घाट भागातील बजरंग गणेश मंडळात रात्री १.३० वाजेच्या सुमारास झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांना सदर बाजार पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले

गणेश मंडळात जुगार अड्डा; आठ अटकेत
जालना : शहरातील हनुमान घाट भागातील बजरंग गणेश मंडळात रात्री १.३० वाजेच्या सुमारास झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांना सदर बाजार पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले. यात आठ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ४ हजार ६०७ रूपये जप्त करण्यात आले.
सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक गणेशोत्सव काळात अप्रिय घटना घडू नये, यासाठी गस्तीवर होते. पोलिस निरीक्षक संतोष पाटील हे कन्हैय्यानगर भागातून राष्ट्रीय हिंदी विद्यालयाकडे येत असतांना गणेश मंडळासमोर दिव्याखाली जुगार खेळतांना काही जण दिसले. पाटील यांनी सहकाऱ्यांसह छापा मारून आरोपी रामेश्वर ममताजी शिंदे, योगेश रामेश्वर गवारे, दत्ता गणेश शिंदे, सतीश जनार्धन घोडके, प्रेमानंद छन्नू चौधरी, विष्णू दगडू साबळे, संतू दगडू साबळे यांना पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोनवरून बोलल्याने
विवाहितेला मारहाण
अहेर वाहेगाव (जि.बीड) सन्ना रईस चाऊस या विवाहितेला ‘तू नेहमी फोनवर बोलत असते,’ या कारणावरून रईस मिया चाऊस, सईद मिया चाऊस, कुरेशी चाऊस यांनी मारहाण करून घरातून हाकलून दिले.
माहेराहून ४० हजार रूपये आण, असा दम दिला. ही घटना नुकतीच घडल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी सन्ना चाऊस या विवाहितेने गोंदी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
जालना : जालना-औरंगाबाद मार्गावर बदनापूर येथील हॉटेल महाराजा समोर देवराव गाडेकर हे महामार्ग ओलांडत असतांना मोटारसायकल (एम.एच.२१ ऐ.जे. ८८३१) स्वाराने जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा प्रकार २ सप्टेंबर रोजी घडला.
४बदनापूर गावात घडलेल्या प्रकारानंतर मोटारसायकलस्वार पळून गेल्याचे दत्ता देवराव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार तांबे करीत आहेत. घटनेनंतर अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.