औरंगाबाद : एक लाख रुपये गुंतविल्यास दरमहा सहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गॅलेट कंपनीविरोधात आणखी चार तक्रारी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या. या तक्रारींमुळे फसवणुकीचा आकडा एक कोटीपर्यंत गेला असून, आणखी काही तक्रारी वाढण्याची शक्यता तपास अधिकाºयांनी व्यक्त केली. गॅलेट कंपनीचा संचालक चेतन भोपलवदची संपत्ती विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.गॅलेट कंपनीचा संचालक चेतन भोपलवद याने गॅलेट फायनान्शियल सर्व्हिसेस ही शेअर ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. याशिवाय तो त्रिस्टा फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाचेही फर्म चालवीत होता.त्याच्याविरोधात आजपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त तक्रारीनुसार १३ जणांची एक कोटीपर्यंतची फसवणूक झाल्याचे समोर आले. शिवाय आणखी तक्रारदार वाढण्याची शक्यता तपास अधिकारी उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, चेतन भोपलवदने गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्यापासून केलेल्या गुंतवणुकीची माहिती घेत आहोत. त्याने करमाड येथे शेती घेतल्याचे समोर आले. शिवाय पगारिया कॉलनीतही शेजारचा प्लॉट खरेदी केल्याचे समोर आले. त्याची विविध बँकांत १६ खाती आहेत. शिवाय वाकडी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथेही त्याची शेती असल्याची माहिती मिळाली. चेतनची मालमत्ता विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत केली जाणार आहे. २७ डिसेंबर रोजी त्याची पोलीस कोठडी संपणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गॅलेट कंपनी मालकाची संपत्ती विकून देणार गुंतवणूकदारांना पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:02 IST
एक लाख रुपये गुंतविल्यास दरमहा सहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गॅलेट कंपनीविरोधात आणखी चार तक्रारी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या.
गॅलेट कंपनी मालकाची संपत्ती विकून देणार गुंतवणूकदारांना पैसे
ठळक मुद्देआणखी चार गुंतवणूकदारांनी केली तक्रार: फसवणुकीचा आकडा सव्वाकोटीपर्यंत जाण्याची शक्यता