गायकवाड यांनी स्वीकारला कुलसचिवपदाचा प्रभार

By Admin | Updated: January 7, 2015 01:05 IST2015-01-07T00:45:32+5:302015-01-07T01:05:50+5:30

औरंगाबाद : मंगळवारी सकाळी डॉ. धनराज माने यांनी कुलसचिवपदाची सूत्रे डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करून ते येथून कार्यमुक्त झाले.

Gaikwad accepted the charge of the post of secretary | गायकवाड यांनी स्वीकारला कुलसचिवपदाचा प्रभार

गायकवाड यांनी स्वीकारला कुलसचिवपदाचा प्रभार

औरंगाबाद : मंगळवारी सकाळी डॉ. धनराज माने यांनी कुलसचिवपदाची सूत्रे डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करून ते येथून कार्यमुक्त झाले. दुपारी ४ वा. पुणे येथे पोहोचल्यानंतर डॉ. माने यांनी राज्याच्या उच्च शिक्षण संचालकपदाची सूत्रे स्वीकारली.
सोमवार दुपारनंतर विद्यापीठात अत्यंत वेगाने घडामोडी घडल्या. डॉ. धनराज माने यांची उच्च शिक्षण संचालकपदी निवड झाली होती. काल त्यांना संचालकपदी तात्काळ रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले; पण कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे ३ जानेवारीपासून मुंबईत आहेत. ते इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले असल्यामुळे मावळते कुलसचिव डॉ. माने यांची अडचण झाली होती. त्यांनी मोबाईलवरून कुलगुरूंना संपर्क साधला व मंगळवारी कार्यमुक्त होत असून, कुलसचिवपदाची सूत्रे कोणाकडे द्यावी, याबाबत सल्लामसलत केली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व प्रभारी कुलसचिवपदी सक्षम व्यक्तीची वर्णी लावण्याबाबत चर्चा केली. तेव्हा विद्यमान परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार देण्याचा चर्चेअंती निर्णय घेण्यात आला.
आज सकाळी डॉ. माने यांनी कॅप्टन गायकवाड यांना संपर्क साधून कार्यालयात बोलावून घेतले व त्यांच्याकडे कुलसचिवपदाची सूत्रे देऊन ते येथून कार्यमुक्त झाले. डॉ. माने यांनी उपस्थित कर्मचारी- अधिकारी व प्राध्यापकांचा निरोप घेत ते पुण्याकडे रवाना झाले.

Web Title: Gaikwad accepted the charge of the post of secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.