गड्डी गँगच्या सदस्यांनी उडवले पैसे बारबालांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:50 IST2017-10-31T00:49:51+5:302017-10-31T00:50:13+5:30
कागदांची बंडले सोपवून सामान्यांना गंडविणा-या गड्डी गँगच्या म्होरक्याला सायबर गुन्हे सेलच्या पथकाने मुंबईतून पकडून आणले. गड्डी गँग ही अय्याशी गँग म्हणून मुंबईत ओळखली जाते.

गड्डी गँगच्या सदस्यांनी उडवले पैसे बारबालांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कागदांची बंडले सोपवून सामान्यांना गंडविणा-या गड्डी गँगच्या म्होरक्याला सायबर गुन्हे सेलच्या पथकाने मुंबईतून पकडून आणले. गड्डी गँग ही अय्याशी गँग म्हणून मुंबईत ओळखली जाते. ते फसवणूक आणि लुटमार करून आलेले पैसे बारबालांवर उडवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. विशेष म्हणजे ते नेहमी लॉजवर मुक्काम करीत आणि हॉटेलमध्येच जेवण करीत.
याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा भागात एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे, असे धमकावून त्याने काढलेले २० हजार रुपये हिसकावले. यानंतर त्याचे एटीएम कार्ड हिसकावून घेत आणि पासवर्ड विचारून आरोपींनी परस्पर आणखी तेवढीच रक्कम काढली होती. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तारभवनसमोरील एसबीआय बँकेसमोर घडलेल्या दुस-या एका घटनेत आरोपींनी एका जणाला गाठून त्याच्याकडील चोरीची मोठी रक्कम तुमच्या खात्यावर टाका, त्यातून दहा हजार रुपये कमिशन म्हणून घ्या आणि आम्हाला एटीएम कार्ड व पासवर्ड द्या, आम्ही आमची रक्कम काढून तुमचे एटीएम कार्ड परत करतो, अशी थाप मारली. यावेळी तक्रारदार यांच्या हातात पैशांच्या गड्डीसारख्या दिसणाºया बंडलाची कॅरीबॅग सोपवून आरोपी एटीएम कार्डसह पसार झाले होते. त्यांनी नंतर त्या एटीएम कार्डचा वापर करून १ लाख ४८ हजार रुपयांचा माल परस्पर खरेदी केला. आरोपींनी दिलेल्या कॅरिबॅगमध्ये नोटा नव्हे, तर कोºया कागदांची बंडले होती. प्रत्येक बंडलाच्या वरची आणि खालची नोट खरी होती. या गँगचा म्होरक्या सागर अंभोरे यास मुंबईतील उल्हासनगर भागातून पोलिसांनी पकडले. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्यांची छायाचित्रे पोलिसांना मिळाली होती.