कार्तिक पौर्णिमेला श्रीक्षेत्र देवगड येथे गाभारा दर्शन बंद
By | Updated: November 29, 2020 04:07 IST2020-11-29T04:07:22+5:302020-11-29T04:07:22+5:30
रविवारी दुपारी १२.४७ वाजेपासून कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. सोमवारी पहाटे ६ वाजून ३ मिनिटे असा मुहूर्त आहे. दरवर्षी ...

कार्तिक पौर्णिमेला श्रीक्षेत्र देवगड येथे गाभारा दर्शन बंद
रविवारी दुपारी १२.४७ वाजेपासून कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. सोमवारी पहाटे ६ वाजून ३ मिनिटे असा मुहूर्त आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला येथे दोन लाख भाविक भगवान दत्तात्रयांसह येथे असलेल्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी येतात. यंदा कोरोना संकटामुळे भाविकांना मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिर प्रवेशद्वाराच्या कीर्तन मंडपातून बाहेरून भगवान दत्तात्रयांचे व कार्तिक स्वामींचे मुखदर्शन घ्यावे लागणार आहे. भाविकांनी कार्तिक पौर्णिमेला कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे व गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे कार्तिक पौर्णिमेला होणारे अन्य विधीही रद्द करण्यात आले आहेत. सोमवारी फक्त दुपारची आरती होणार आहे. याची भाविकांनी नोंद घेऊन मंदिर व्यवस्थानास सहकार्य करावे, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले आहे.