जी. श्रीधर यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:37 IST2017-01-09T23:31:30+5:302017-01-09T23:37:21+5:30
बीड : नूतन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला

जी. श्रीधर यांनी स्वीकारला पदभार
बीड : नूतन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. रविवारी रात्रीच ते बीडमध्ये दाखल झाले होते. पदभार स्वीकारल्यानंतर ते औरंगाबादला रवाना झाले.
पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची रायगडला बदली झाली. त्यांच्या जागी नागपूर येथून जी. श्रीधर आले आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश गावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांचा सत्कार झाला. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांची भेट घेऊन सायंकाळी ते परतले. त्यांनी अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. (प्रतिनिधी)