शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची आगळीवेगळी कारवाई; अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादी अन् आरोपी एकच कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:20 IST

प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार अपघातात एक उच्चपदस्थ अधिकारी होता.

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी सायंकाळी बीबी-का-मकबऱ्यासमोर चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात जखमींनी अचानक तक्रारीस नकार दिला. त्यानंतर, एका हाॅटेल चालकाने ठाण्यात हजर होऊन अपघात केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना, तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारदारालाच आरोपी करत, एक आगळा वेगळा गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी दाखल केला.

सोमवारी दुपारी मकबरा परिसरात एम एच १५ - एच एम - ९९५२ या कार चालकाने दोघांना उडविले. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार यात एक उच्चपदस्थ अधिकारी होता. हनुमान टेकडी परिसरात एका सोसायटीत कार सोडून तो पसार झाला. जखमी रात्री ठाण्यातही गेले. मात्र, अचानक काही कॉल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. याच दरम्यान पडेगावमधील रायबा हॉटेलचे चालक समीर श्रीकृष्ण अंबारखाने हे ठाण्यात दाखल झाले. हा अपघात माझ्याकडून झाल्याची कबुली देत, अपघातानंतर मी घाबरल्याने निघून गेलो, असा जबाब दिला. त्यानुसार, पोलिसांनी अंबारखाने यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या संदर्भात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला विचारणा केली असता, हा गुन्हाच योग्य प्रकारे दाखल केला नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेत आरोपी स्वत: ठाण्यात हजर होत असेल, तर उपस्थित पोलिस अंमलदार, डीओने त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते, शिवाय डायरी नोंदमध्ये तसे नमूद केले, तरी न्यायालयात तेही एफआयआरच्याच समान मान्य केले जाते. त्यामुळे एफआयआरमध्ये फिर्यादी व आरोपी एक होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

कबुलीजबाब सिद्ध होणार नाहीतपासात सिद्ध झाल्यानंतर तक्रारदाराला आरोपी करता येते. मात्र, त्यासाठी तपास, चौकशी आवश्यक असते. एफआयआर दाखल करतानाच, तक्रारदारालाच आरोपी करणे योग्य नाही. कायद्याच्या दृष्टीने ते टिकणारही नाही. भारतीय पुरावा कायदा कलम २५ नुसार पोलिस अधिकाऱ्याला दिलेला कबुलीजबाब कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध सिद्ध करता येणार नाही.- ॲड.प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस