खाम नदी पात्राच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:02 IST2021-04-10T04:02:51+5:302021-04-10T04:02:51+5:30
आमदार अंबादास दानवे यांनी दिनांक १ मार्च २०१९ रोजी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट ...

खाम नदी पात्राच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार
आमदार अंबादास दानवे यांनी दिनांक १ मार्च २०१९ रोजी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खाम नदीचे पात्र जवळपास सात किलोमीटर लांबीचे असल्याची व या नदीचे सुशोभीकरण झाल्यास स्थानिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊन शहरात आणखी एका पर्यटन स्थळाची भर पडणार असल्याने या कामासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी विनंती केली होती.
दानवे यांच्या या मागणीला आदित्य ठाकरे यांनी ८ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये जिल्हा नियोजन अधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यासाठी अंदाजपत्रकासह आवश्यक प्रस्ताव पर्यटन संचालनालय यांच्यामार्फत शासनास तत्काळ सादर करण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.