निधी,पाण्याचा तुटवडा

By Admin | Updated: July 24, 2014 00:27 IST2014-07-24T00:13:04+5:302014-07-24T00:27:13+5:30

कंधार : महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना पूर्ण होण्यास मोठा गतिरोध निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

Fundraising, water scarcity | निधी,पाण्याचा तुटवडा

निधी,पाण्याचा तुटवडा

कंधार : महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना पूर्ण होण्यास मोठा गतिरोध निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. निधीचा तुटवडा अन् अपुरा जलसाठा आदीमुळे अनुसूचित जातीच्या कुटुंबांना याचा फटका सहन करण्याचा प्रसंग जिल्हाभर ओढवल्याचे समजते.
जिल्ह्यातील या योजनेची माहिती समोर आली आहे. १४८ ग्रामपंचायतींतील ८ हजार ४५३ अनु. जातीतील कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. त्यात पाणी जोडणीसाठी १२३० कुटुंबांना मिळणार असे दिसून आले. परंतु सर्वच कामे प्रगतीपथावर असल्याचा अहवाल समोर आला. महिन्यात थोडीशी पूर्ण कामे झाली असतील, परंतु बहुतांशी कामे अपूर्ण असल्याचे समजते. योजनेवर जिल्ह्यात २३ लाख ३७ हजार खर्च झाला.
वैयक्तिक शौचालय बांधकामाची अवस्थासुद्धा जवळपास कमी-अधिक प्रमाणात तशीच आहे. ८ हजार ४५३ पैकी अवघे २ हजार ९५ कामे पूर्ण झाली परंतु ६ हजार ३५८ कामे अर्धवट होते. यात महिन्यातही फारसा फरक पडला नसल्याचे सूत्रांकडून समजते. अर्धापूर तालुक्यातील २३ पैकी १६ कामे पूर्ण ७ प्रगतीपथावर, किनवटमध्ये ४१९ पैकी १२८ पूर्ण, नायगाव ८३४ पैकी २१३ कामे पूर्ण, माहूर २४ पैकी ६, देगलूर- १९७२ पैकी ४७५, मुखेड- ९१९ पैकी ३४५, हदगाव ६५२ पैकी १०७, मुदखेड- ३८८ पैकी ६३, धर्माबाद ६१२ पैकी ६३, शौचालये बांधकाम पूर्ण झाले. बिलोली २२०, हिमायतनगर १४६, लोहा ७९ आणि उमरी तालुक्यातील ५४ मंजूर कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. त्यात फारसा फरक आता पडला नाही. थोडीशी कामे कदाचित पूर्ण झाली असतील.
कंधार तालुक्यातील पा.पु. ३३१ कामे प्रगतीपथावर होते. १५ ग्रामपंचायती अंतर्गत १८७७ अनु. जाती मधील कुटुंबांना शौचालय बांधकामांना मंजुरी मिळाली. त्यातील ६५९ कामे पूर्ण झाली. परंतु १२१८ कामे ही प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. चिखलभोसी २५, लालवाडी १२, देवयाचीवाडी २४ या गावात आपले उद्दिष्ट पूर्ण केली. परंतु पानभोसी २५२, शेकापूर १७७, बहाद्दरपुरा ९१, दिग्रस बु. ११०, कुरुळा- २०६, घोडज १५३, शिरुर ७५, हरबळ ५४, गुंटूर ७८, शिराढोण २०७, वरवंट ६३ आणि आंबुलगा २७० कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यात यश आले नाही. कामे खोळंबण्यास निधीचा तुटवडा असल्याचे प्रमुख कारण आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थी कुटुंबांना मंजुरी मिळाल्यानंतर आनंद झाला. कामे पूर्ण होऊन वापर करता आला असता तर अधिक आनंद झाला असता. कामे पूर्ण करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Fundraising, water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.