पालिकांसाठी पावणेसहा कोटींचा निधी
By Admin | Updated: September 7, 2014 00:23 IST2014-09-07T00:19:27+5:302014-09-07T00:23:52+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश पालिकांतर्गतच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हीच बाब लक्षात घेवून शासनाने जिल्ह्यातील पालिकांसाठी २९ लाख ८६ हजार ४३६ तर

पालिकांसाठी पावणेसहा कोटींचा निधी
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश पालिकांतर्गतच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हीच बाब लक्षात घेवून शासनाने जिल्ह्यातील पालिकांसाठी २९ लाख ८६ हजार ४३६ तर वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी ५ कोटी ५९ लाख ८४ हजार ५५९ रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न व विविध उपक्रम मार्गी लागणार आहेत.
उस्मानाबाद पालिकेसोबतच अन्य शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मात्र पालिकांकडे निधीची कमतरता असल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होत नव्हती. बहुतांश पालिकांनी शासनाकडे रस्ता दुरुस्तीसाठी अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने जिल्ह्यातील पालिकांना रस्ता दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर केले आहे. मंजूर अनुदानाचा आकडा २९ लाख ८६ हजार ४३६ इतका आहे. यामध्ये भूम पालिकेला १ लाख ९७ हजार २२४, कळंब २ लाख ७३ हजार २१९, मुरुम १ लाख ९५ हजार २०५, नळदुर्ग १ लाख ९४ हजार ८८७, उस्मानाबाद ११ लाख ८८ हजार २२२, परंडा १ लाख ९९ हजार ३१७, तुळजापूर ३ लाख ६१ हजार ३९२ आणि उमरगा पालिकेसाठी ३ लाख ७६ हजार ३६९ रुपये रस्ता अनुदान मिळाले आहे. ही सर्व रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम दोन टप्प्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १७ लाख ९१ हजार ८३२ तर दुसऱ्या टप्प्यात ११ लाख ९४ हजार ५७५ रुपये वितरित केले जातील. वैशिष्ट्यपूर्ण योजनांतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी शासनाने सर्वाधिक ५ कोटी ५९ लाख ८४ हजार ५५९ रुपये इतके अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये भूम पालिकेसाठी १ कोटी, कळंबसाठी ५० लाख, मुरुमसाठी ५० लाख, नळदुर्गसाठी ७० लाख, उस्मानाबादसाठी २ कोटी, परंडासाठी ५० लाख तर तुळजापूर पालिकेसाठी ३९ लाख ८४ हजार ५५९ रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याही अनुदानाची रक्कम दोन टप्प्यामध्येच दिली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३ कोटी ३५ लाख ९० हजार ७३५ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये २ कोटी २३ लाख ९३ हजार ८२४ रुपये अनुदान दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्याला जवळपास साडेपाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ७ पैकी केवळ दोन पालिकांना ५० टक्के निधी देण्यात आला आहे. उस्मानाबाद पालिकेला सर्वाधिक २ कोटी तर भूम पालिकेला १ कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वात कमी निधी तुळजापूर पालिकेला मिळाला असून, ३९ लाख ८४ हजार ५५९ एवढी अनुदानाची रक्कम आहे.