पूर्णवेळ कार्यकर्ता हा नेतृत्व घडवणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:05 IST2021-02-24T04:05:12+5:302021-02-24T04:05:12+5:30

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी संघटना सांगेल तेथे जाऊन कार्य करणे, ही विद्याविभूषित कार्यकर्त्यांची ...

A full-time worker is a leader | पूर्णवेळ कार्यकर्ता हा नेतृत्व घडवणारा

पूर्णवेळ कार्यकर्ता हा नेतृत्व घडवणारा

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी संघटना सांगेल तेथे जाऊन कार्य करणे, ही विद्याविभूषित कार्यकर्त्यांची परंपरा जपत औरंगाबाद शाखेचे पूर्णवेळ कार्यकर्ते शुभम खरात व गोविंद देशपांडे हे अनुक्रमे मुंबई व सिंधूदुर्ग येथे जात आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाी आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत कार्यवाह हरिष कुलकर्णी व अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री अभिजीत पाटील उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते हरिष कुलकर्णी यांनी अभाविपचा कार्यकर्ता हा नेहमीच सतर्क असतो. पूर्णवेळ कार्यकर्ता हा परिषदेच्या कार्याचा मुख्य भाग आहे, आणि आज औरंगाबाद शाखेतून दोन कार्यकर्ते हे पूर्णवेळ जात आहेत ही आनंदाची बाब आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रांत संघटनमंत्री पाटील म्हणाले, पूर्णवेळ कार्यकर्ता हा विद्यार्थी कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक असतो. तोच खरा नेतृत्व घडवणारा असतो. यावेळी पूर्णवेळ कार्यकर्ते गोविंद देशपांडे व शुभम खरात यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती जोशी यांनी केले.

Web Title: A full-time worker is a leader