संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र रजेवर
By Admin | Updated: October 1, 2014 00:38 IST2014-10-01T00:38:54+5:302014-10-01T00:38:54+5:30
औरंगाबाद : ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दप्तरच जिल्हा परिषदेत आणून जमा केल्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने तडकाफडकी कारवाई करून एका पर्यवेक्षिकेस निलंबित केले.

संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र रजेवर
औरंगाबाद : कायम गैरहजर राहणारे डॉक्टर, परिचारिकांना कंटाळून वरूडकाजी (ता. औरंगाबाद) येथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दप्तरच जिल्हा परिषदेत आणून जमा केल्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने तडकाफडकी कारवाई करून एका पर्यवेक्षिकेस निलंबित केले. दोन डॉक्टरांना कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या, तर १० परिचारिका, आरोग्यसेवकांच्या दोन वार्षिक वेतनवाढी थांबविण्यात आल्या.
शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूडकाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक व शिपाई वगळता सर्वच वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पर्यवेक्षिका मागील अनेक दिवसांपासून आरोग्य केंद्राला दांडी मारत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद पडले असून, ग्रामस्थ आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत.
सूत्रांनी सांगितले की, सोमवारी या आरोग्य केंद्रात फक्त एक लिपिक व शिपाई दोघेच हजर होते. त्यामुळे सरपंच व गावकऱ्यांनी दप्तर जप्त केले व आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. हे दप्तर त्यांनी जिल्हा परिषदेला सादर केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले की, उपरोक्त घटनेवरून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाविस्कर व डॉ. वाघ यांना चौकशीसाठी त्या गावात पाठविले.