विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची फुलंब्रीत कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:05 AM2021-04-18T04:05:06+5:302021-04-18T04:05:06+5:30

फुलंब्री : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यासाठी नगराध्यक्ष रस्त्यावर उतरले असून, त्यांच्या पथकाने केलेल्या चाचणीत एकाच दिवशी १५ ...

Fulbright corona test of unruly citizens | विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची फुलंब्रीत कोरोना चाचणी

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची फुलंब्रीत कोरोना चाचणी

googlenewsNext

फुलंब्री : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यासाठी नगराध्यक्ष रस्त्यावर उतरले असून, त्यांच्या पथकाने केलेल्या चाचणीत एकाच दिवशी १५ जण बाधित आढळले. त्यामुळे रिकामटेकड्या फिरणाऱ्यांवर जरब बसला असून, दुपारनंतर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.

शासनाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. या निर्बंधांचे पालन होताना दिसून येत नाही. फुलंब्री शहरात काहीएक काम नसताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई व्हावी म्हणून फुलंब्री नगर पंचायतीचे अधिकारी, पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये बाहेर फिरताना व्यक्ती आढळून आली, तर तिला पकडून तिची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळे चाचणीच्या धास्तीने दुपारनंतर गावात शुकशुकाट पसरला होता. दिवसभरात करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत १५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यात काही अंशी का होईना, यश आले आहे; अन्यथा या बाधितांकडून संक्रमण वाढले असते. खुद्द नगराध्यक्ष सुहास सिरसाठ व मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी शनिवारी रस्त्यावर उतरून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी केली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

फोटो :

फुलंब्री शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करताना आरोग्य अधिकारी.

170421\rauf usman shaik_img-20210417-wa0033_1.jpg

Web Title: Fulbright corona test of unruly citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.