चार वर्षांपासून फरार अट्टल गुन्हेगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:08 IST2021-09-02T04:08:47+5:302021-09-02T04:08:47+5:30

औरंगाबाद : चार वर्षांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार सिकंदर खान नजीर खान (४४, रा. शहानूरवाडी) याला मध्यवर्ती बसस्थानकाजवळ गुन्हे ...

Fugitive Attal criminal caught for four years | चार वर्षांपासून फरार अट्टल गुन्हेगार पकडला

चार वर्षांपासून फरार अट्टल गुन्हेगार पकडला

औरंगाबाद : चार वर्षांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार सिकंदर खान नजीर खान (४४, रा. शहानूरवाडी) याला मध्यवर्ती बसस्थानकाजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.

अट्टल गुन्हेगार चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यानुसार रचलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला. त्याच्या ताब्यातून चार मोबाईल जप्त केले.

गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा लावण्यात आला. रेकॉर्डवरील गुन्हेगार सिकंदर खान नजीर खान हा विविध कंपन्याचे मोबाईल विकण्यासाठी घेऊन आला होता. त्याच्याकडून जप्त केलेले मोबाईल त्याने मित्र अन्नू टकल्या (रा. कैसर कॉलनी) याच्या मदतीने चाेरल्याची माहिती पोलिसांना दिली. सिकंदर याच्या विरोधात छावणी, क्रांतीचौक पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, सहायक फाैजदार नजीर खान पठाण, सुधाकर मिसाळ, नवसारे, जायभाये यांच्या पथकाने केली.

Web Title: Fugitive Attal criminal caught for four years