भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले, सिग्नल न पाळल्याने बेतले जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 16:55 IST2017-10-08T16:54:30+5:302017-10-08T16:55:58+5:30
पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला.

भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले, सिग्नल न पाळल्याने बेतले जीवावर
औरंगाबाद, दि. ८ : पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकात घडली.
दिलीप विठ्ठलराव गलधर(वय ५०,रा. घारेगाव, ता. औरंगाबाद)असे मृताचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दिलीप गलधर हे रविवारी दुपारी देवळाईकडून शहराकडे मोटारसायकलने (एमएच-२०बीएन १७६२)जात होते. दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकातील वाहतुक दिवा ग्रीनवरून पिवळा झाला. यावेळी गलधर हे वेगात निघाले. त्याचवेळी झाल्टा फाट्याकडून महानुभाव आश्रम चौकीकडे निघालेल्या टँकरसह अन्य वाहने (एमएच-२०डीई ७०७२) पुढे जाण्यासाठी वेगात निघाले. अर्ध्या रस्त्यावर आलेले असताना एका ट्रकचालकाने त्यांना वाचविले मात्र पुढच्या टँकरने त्यांना चिरडले.
या भीषण घटनेत गलधर यांच्या डोक्यावरील हेल्मेटचा चुरडा होऊन त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच टॅँकरचालकाने त्यांना सुमारे आठ ते दहा फुट फरपटत नेले. यामुळे गलधर हे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच देवळाई चौकीतील पोहेकॉ एन.के. ब-हाटे, सातारा ठाण्याचे चार्ली पोलीस, वाहतूक शाखेचे सुरेश तारो, ज्ञानदेव डिघुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांची गाडी आणि अॅम्ब्युलन्स बोलविण्यात आली. मात्र तत्पूर्वीच लोकांनी गलधर यांना घटनास्थळावरून रुग्णालयातून हलविले. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली.