शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

थकीत एफआरपीसाठी ऊस उत्पादकांचे साखर सहसंचालकांच्या कार्यालयालात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:12 IST

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले. मात्र, सर्व कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयाचे कुलूप उघडलेच नाही. यामुळे त्यांनी गेटवर घोषणाबाजी सुरु केली. संतापलेल्या ऊस उत्पादकांनी अखरे क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरु केले. 

क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. आज सकाळी बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक उस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायऱ्यावर बसून आंदोलन सुरु केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन.व्ही.गायकवाड याही कार्यालयात आल्या नाहीत. शेतकऱ्यांनी साखरकारखानदार व सरकार,प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऊसउत्पादक कार्यालयासमोर बसून होते. 

८ महिन्यांपासून रक्कम थकीत बीड जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठीही  सहसंचालक न आल्याने संतापलेल्या ऊसउत्पादकांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरु केले. शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रीज, लोकनेते सुंदरराव सोळंके  सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर सुमारे १५० कोटीपर्यंत आहे तो  दिला नाही. मागील ८ महिन्यापासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.  हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही. तसेच कर्जही मिळाले नाही. उसाचे एफआरपी मिळाली नाही. अखेर शेतकऱ्यांनी काय करावे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजु पठाडे, अशोक गायकवाड,सय्यद पठाण यांच्यासह बीड जिल्ह्यातील उस उत्पादक हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनSugar factoryसाखर कारखाने