शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा
By Admin | Updated: June 16, 2017 23:36 IST2017-06-16T23:31:36+5:302017-06-16T23:36:16+5:30
नांदेड: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या मागण्यांसाठी १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़

शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या मागण्यांसाठी १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़
२७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द कराव्यात, २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, प्राथमिक पदवीधरांना सरसकट ४ हजार ३०० रुपये ग्रेड पे लागू करावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे़ मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक नीळकंठ चोंंडे, तस्लीम शेख, देवीदास बस्वदे, मधुकर उन्हाळे, डी़ एम़ हानमंते, एम़ ए़ गफार, चंद्रकांत दामेकर, बी़ एस़ पांडागळे, जी़ सी़ चव्हाण, विठ्ठल बनबरे, गुणवंत काळे, संजय कोठाळे, विठ्ठलराव ताकबिडे यांनी केले आहे़