खासदारांच्या घरासमोर
By Admin | Updated: March 24, 2016 00:45 IST2016-03-24T00:33:59+5:302016-03-24T00:45:45+5:30
लातूर : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केल्याच्या निषेधार्थ खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्या घरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

खासदारांच्या घरासमोर
लातूर : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केल्याच्या निषेधार्थ खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्या घरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचारमंचच्या वतीने स्वतंत्र मराठवाडा मागणीचे निवेदन खासदारांच्या उपस्थितीत पंतप्रधान कार्यालयाकडे देण्यात आले. शिवाय, मराठवाडा राज्य मागणीचे जोरदार समर्थन खा. गायकवाड यांनी केले आहे. राज्य झाल्यासच मराठवाड्याचा विकास होईल आणि पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही विधान खासदारांनी केले आहे. याचा निषेध करण्यासाठी लातूर शहरातील प्रकाश नगर येथील खा.डॉ. गायकवाड यांच्या घरासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. स्वतंत्र राज्याची मागणी करणे म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अवमान आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा मनसे खपवून घेणार नाही, असे यावेळी संतोष नागरगोजे म्हणाले.
आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह लताताई गायकवाड, राज क्षीरसागर, अॅड. चापलीकर, प्रमोद जोशी, मनोज अभंगे, युवराज कांबळे, महादेव कलमुकले, बजरंग ठाकूर, बालाजी पाटील, सतीश कदम, बाळू डोंगरे, मुन्वर सय्यद, वैभव जाधव, संजय चव्हाण, भागवत कांदे आदी सहभागी झाले होते. यावेळी श्रीहरी काळे, बबलू पाटील, शिवा माने, राहुल माकणीकर, जहाँगीर शेख, अमित पवार, अक्षय चव्हाण, शैलेश सूर्यवंशी, राजाभाऊ कांबळे, राम इगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)