शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या पुनर्गठणासाठी मोर्चा

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

पाथरी: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे, या मागणीसाठी ३१ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या वतीने मोर्चा

पाथरी: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे, या मागणीसाठी ३१ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन राष्ट्रीयकृत बँकांना टाळे ठोकून असहकार आंदोलन करण्यात आले. सेलू कॉर्नर परिसरात पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलनकर्त्यांना अटक केली.गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत राज्य सरकारने मार्च महिन्यात आदेश काढला होता. परंतु, जिल्ह्यातील बँकांनी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठण करुन दिले नाही, म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून ३१ जुलै रोजी पक्षाच्या वतीने बाजार समिती परिसरातून दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला. मुख्य रस्त्याने हा मोर्चा नेण्यात येऊन सेलू कॉर्नर परिसरातील स्टेट बँक आॅफ हैैदराबाद व स्टेट बँक आॅफ इंडिया या दोन शाखेला मोर्चेकऱ्यांनी टाळे ठोकले. त्यानंतर बँक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये विलास बाबर, दीपक लिपने यांच्यासोबत उद्धव पौळ, बालासाहेब गिराम, गोपी शिंदे, भारत फुके, राधाकिशन आव्हाड यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.(वार्ताहर)आंदोलकांवर कारवाईसेलू कॉर्नर परिसरात मोर्चेकरी आल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. यावेळी कॉ.विलास बाबर, कॉ.दीपक लिपणे, कॉ.लिंबाजी कचरे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहून पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर बळाचा वापर करुन आंदोलनकर्त्यांना बळजबरीने पोलिस व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर इतर कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पोलिस ठाणे गाठले. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.