जिल्हाकचेरीवर घरकुलासाठी मोर्चा
By Admin | Updated: July 1, 2014 00:38 IST2014-07-01T00:32:55+5:302014-07-01T00:38:16+5:30
नांदेड : एनटीसी मिल भागातील नागरिकांनी घरकुलासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला़

जिल्हाकचेरीवर घरकुलासाठी मोर्चा
नांदेड : एनटीसी मिल भागातील नागरिकांनी घरकुलासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला़
नांदेड टेक्सटाईल मिल घरकुल कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला़ एनटीसी मिल परिसरातील नल्लागुटाचाळ, देगावचाळ, भय्यासाहेब आंबेडकरनगर, भीमघाट, गोलचाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ येथील झोपडीपट्टी धारकांना घरकुले बांधून देण्याचा प्रस्ताव रेंगाळल्याने येथील लाभार्थ्यांनी सहभाग घेतला़
यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देवून घरकुले देण्याची मागणी करण्यात आली़ तसेच या परिसरात भीमघाट येथे ३३ के़ व्ही़ विज केंद्र उभारले आहे़ पक्कीचाळ येथे पोलिस चौकी उभारली आहे़
खडकपुरा येथे जलकुंभ, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे़ या सर्व उभारणीसाठी नांदेड टेक्सटाईल मिल प्रशासनाने परवानगी दिली़ मात्र गोरगरीबांच्या घरकुलासाठी परवानगीच्या नावाखाली अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़
मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष श्रीधर हटकर, नारायणराव सदावर्ते, मिलिंद शिराढोणकर, भगवान ढगे, सत्यानंद शिवरात्री, संजय टिके, संजय वाघमारे, साहेबराव थोरात, अनिल गोडबोले, पंजाला सुरेश, सुभाष लोखंडे, सतीश हिंगोले, संतोष नरवाडे, भगवान तारू, कामाजी लांडगे, सुरेश सावळे, ईश्वर चित्रपु, शिवराम कॅकला, सुरेश हाटकर, स़ सलीम स़ उमर, शे़ फारूख शे ़ दाऊद, श्रावण नरवाडे, साहेबराव शेंडेराव, राम स्वामी रेगुला, नंदु खाडे, नंदू जोंधळे, नामदेव दिपके, अनिल लांडगे, गणेश सावंत, नुमाजी खाडे, केशव थोरात, शेख अकबर, शेख रहेमत अलू, संभाजी नरवाडे, लताबाई वाघमारे, संजिवनी सावळे आदींनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)