शेतकरी समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:58 IST2017-08-24T00:58:59+5:302017-08-24T00:58:59+5:30
विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला

शेतकरी समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला.
जुना जालना भागातील गांधीचमन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या पिकाला हमी भाव नसल्याने कवडीमोल दरात शेतमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.
आधीच दुष्काळाची दाहकता सोसत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना शासनाकडून कुठलाच दिलासा मिळत नसल्याने शेतकºयांत संताप आहे. कर्ज काढून शेतकºयांना शेती करावी लागत आहे. आणि त्यातच निघालेल्या मालाला बाजारात योग्य भावच नसल्याने शेतकºयांनी काय करावे, असा प्रश्न शेतकºयांनी केला. यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांनी निषेध व्यक्त केला.
शेतकºयांना बिनशर्त संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांच्या शेतमालाला हमी देण्यात यावा, २०१६-१७ खरीप हंगामात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, खडकपूर्णा धरणातील पाणी सिंचनासाठी सोडावे, २०१६-१७ चा पीकविमा मंजूर करण्यात यावा, शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर शेततळ्यासाठी प्लास्टीक पन्नी देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात करा, ५५ वर्षे वयाच्या शेतकºयांना पेन्शन देण्यात यावे, आणि समृध्दी महामार्गात ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या त्यांना ५० वर्षांचे उत्पन्न गृहीत धरून मोबदला देण्यात यावा, बाधित शेतकºयांचे पुनर्वसन करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देण्यात आले.
या मोर्चात तालुक्यातील वरूड नाव्हा, पिरकल्याण, वडगाव, वखारी, पत्रातांडा, नंदापूर, कडवंची, पानशेंद्रा, धारकल्याण, बोरखेडी, देवमूर्ती, सोमनाथ जळगाव, भिलपुरी, ब्राह्मणखेडा, आनंदवाडी, धावेडी, थार, अहंकार देऊळगाव, अंभोरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी मोर्चात सहभाग होता.