मोर्चेबांधणीला आला वेग
By Admin | Updated: April 7, 2015 01:23 IST2015-04-07T00:29:12+5:302015-04-07T01:23:54+5:30
बीड : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राष्ट्रवादी काँगेसला जिल्हा बँक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोर्चेबांधणीची मोठी कसरत करावी लागणार आहे

मोर्चेबांधणीला आला वेग
बीड : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राष्ट्रवादी काँगेसला जिल्हा बँक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोर्चेबांधणीची मोठी कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या स्वत: जिल्हा बँक निवडणूकीचे लिड करणार की, पॅनल प्रमुख म्हणून जिल्ह्यातल्या एखाद्या भाजप च्या नेत्याकडे जबाबदारी देणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय बीड भाजप जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहे. सातवर्षापूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत महायुती करण्यात आली होती. आत बँकेवर आपल्याच गटाचे वर्चस्व असले पाहिजे, यासाठी अनेकांनी उघड नव्हे पण अंधारातून लंगोट लावलेला आहे. कारण जिल्हा बँक ताब्यात असणे म्हणजे जिल्ह्यातील राजकीय भूषण आहे. बँक ताब्यात असेल तर कार्यकर्त्यांशी नाळ जोडून रहाते. शिवाय सतत कार्यकर्त्यांच्या गऱ्हाड्यात रहाण्याची सवय असलेल्यांना तर जिल्हा बँकेच्या रूपाने आता संधी आली आहे. हे सर्व जाणून असलेल्या नेत्यांनी आपापल्या पॅनलची तयारी करण्यास सुरू केले आहे. एकूण १९ जागांसाठी निवडणूका होत आहेत. आता भाजप, शिवसेना व मित्रपक्ष एकत्रीत पॅनल उभा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसात नियोजनाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचे अजून निश्चित झालेले नाही. पुढील दोन दिवसात राकॉच्या नेत्यांची बीडमध्ये बैठक आयोजीत केली असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)