धर्माबादला शेतकऱ्यांचा बैलगाडीसह मोर्चा
By Admin | Updated: August 20, 2014 00:17 IST2014-08-19T23:48:11+5:302014-08-20T00:17:18+5:30
धर्माबाद : भारतीय किसान संघातर्फे १९ आॅगस्ट रोजी धर्माबाद तहसीलवर शेतकऱ्यांनी बैलगाडीसह भव्य धडक मोर्चा काढला़

धर्माबादला शेतकऱ्यांचा बैलगाडीसह मोर्चा
धर्माबाद : पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत़ शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रतीहेक्टर ५० हजार रुपये अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे १९ आॅगस्ट रोजी धर्माबाद तहसीलवर शेतकऱ्यांनी बैलगाडीसह भव्य धडक मोर्चा काढला़
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ असा जयघोष करीत शहरातील प्रमुख रस्त्याने प्रभातफेरी काढल्याने शहर गजबजून गेले़ तालुक्यातील १४० बैलगाडी या मोर्चात सहभाग नोंदवला़
तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पोतगंठी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला़
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवराज पा़ मोकलीकर, शिवसेना शहर प्रमुख राजू शिरामणे, सुनील पाटील, भारतीय किसान संघाचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पा़चोळाखेकर, रामराव पा़बाभळीकर, दत्तात्रय तोटावाड, रमेश कुंभारे, दुडे महाराज, प्रकाश घागडे, गौतम मिसाळे आदी शेतकरी व भारतीय किसान संघ कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला़ (वार्ताहर)