हातमाग पाठोपाठ यंत्रमागालाही घरघर

By Admin | Updated: November 16, 2015 00:39 IST2015-11-15T23:22:37+5:302015-11-16T00:39:38+5:30

वडवणी : वडवणी शहर हे टेरीकॉट कापड निर्मितीचे एककाळ माहेरघर होते. आजही हातमागयंत्रा ऐवजी यंत्रमागद्वारे कापड निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

The front behind the spinning wheel | हातमाग पाठोपाठ यंत्रमागालाही घरघर

हातमाग पाठोपाठ यंत्रमागालाही घरघर


वडवणी : वडवणी शहर हे टेरीकॉट कापड निर्मितीचे एककाळ माहेरघर होते. आजही हातमागयंत्रा ऐवजी यंत्रमागद्वारे कापड निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, विजेच्या लपंडावामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे.
वडवणी शहरात एकेकाळी जवळपास ८५० च्या वर हातमागयंत्राद्वारे कापड निर्मिती करण्यात येत होती. दूरवर सुरत, मालेगाव, धुळे, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी सह मराठवाड्यातील कोनाकोपऱ्यात वडवणी टेरीकॉटने नाव कमविले होते. मात्र, बदलत्या काळानुसार हातमागावर सुकाळ पडला व ८५० हातमाग यंत्राला कात्री लागत आज शहरात १९० यंञमाग आजही कार्यरत असलेल्या कापड व्यवसायाला महावितरणाच्या लहरीपणामुळे संकटात सापडला आहे.
आजही वडवणी शहरात यंत्रमागद्वारे गमजे, धोती, फेटे, कॉटन रूमाल इत्यादी कापड तयार करण्यात येत आहे. याला आजही कायम मागणी करण्यात येत असल्याचे यंत्रमाग मालक सुरेश ढवळशंख यांनी सांगितले. आज यंत्रमाग चालविणे अवघड बनले असून, वाढते भारिनयमन व विजेचा लपंडाव यामुळे एकेकाळी दरदिवशी १६ हजार मीटर कापड तयार होत होते. मात्र, आज पाच हजार मीटर कापड तयार करण्यात येत आहे.
यंत्रमागावर काम करण्यासाठी चार मशीनसाठी एक मजूर काम करत आहे त्याचा रोजगारही काढणे भारनियमनामुळे कठीण बनत आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून अनेकांनी वेगळे पर्याय निवडले आहेत. (वार्ताहर)

Web Title: The front behind the spinning wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.