आदिवासी समाजाचा परतुरात मोर्चा
By Admin | Updated: August 14, 2014 01:55 IST2014-08-14T01:08:12+5:302014-08-14T01:55:02+5:30
परतूर : अनुसूचीत जमातीमध्ये इतर प्रवर्गातील जातींचा समावेश न करण्याची मागणी करीत आदीवासी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य

आदिवासी समाजाचा परतुरात मोर्चा
परतूर : अनुसूचीत जमातीमध्ये इतर प्रवर्गातील जातींचा समावेश न करण्याची मागणी करीत आदीवासी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या मोर्चेकऱ्यांनी घोरपड, रानमांजर, ससे व आदिवासींची पारंपरिक वेशभूषा यामुळे लक्ष वेधले होते.
महाराष्ट्र राज्यात अनुसूचीत जमातीमध्ये समावेश होण्यासाठी ज्या जाती उतावीळ आहेत. हा केवळ सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. हा त्यांचा प्रयत्न आदिवासी होण्याचा नसून आदिवासींच्या सवलती व आरक्षणावर डल्ला मारण्याचा डाव आहे.
ज्या जाती आदिवासी समाजात समविष्ट होऊ पाहत आहेत, त्यांचा आदिवासींच्या चालीरिती, परंपरा, व्यवसाय, देवदेवतांचे सण, उत्सव यांचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे आदिवासींच्या प्रवर्गात इतर प्रवर्गाचा समावेश करू नये, याबरोबरच आदिवासी, भिल्ल, पारधी, अंध, महादेव कोळी यांचे ज्या- त्या गावात तालुक्यात जिल्ह्यात पुनर्वसन झाले पाहिजे, इतर जातीमधील आदिवासी जमातीमध्ये शासनाने अन्य कुठल्याही जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करू नये, आमच्या प्रवर्गातील सर्वांना दारिद्र्य रेषा प्रमाणपत्र, रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, नोकरीमध्ये घुसलेले एक लाख चाळीस हजार पेक्षा अधिक बोगस आदिवसींना तात्काळ बडतर्फ करून रिक्त जागेवर गुणवंत व सुशिक्षित आदवसींची नियुक्ती करावी, जुने वितरीत झालेल्या घरकुलाऐवजी नवीन घरकुले द्यावीत आदी मागण्या करीत आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व श्यामराव महाराज, आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर फुपाटे, मच्छिंद्र काळे, जी. डी. जुंदडे, ्जालिंदर चव्हाण, रामू मोते, मुरलीधर गिरे, बन्सी काळे, रमेश पवार, शेषराव काळे, विश्वनाथ दुभळकर, शंकरराव गादेवाड, ज्ञानोबा माऊली, नारायण पाटील, दत्ता बोंडे, बाबासाहेब फुपाटे, आकोलकर, दत्ता फुपाटे, रामकिसन रिठाड , तुळशीराम काळे सह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)