बियाणे न उगवण्याची धास्ती
By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-12T23:46:38+5:302014-07-13T00:19:48+5:30
राणीउंचेगाव : पेरलेले सोयाबीनचे बियाणे किती प्रमाणात उगवते किंवा नाही, ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांना सतावत आहे.

बियाणे न उगवण्याची धास्ती
राणीउंचेगाव : पेरलेले सोयाबीनचे बियाणे किती प्रमाणात उगवते किंवा नाही, ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे एक प्रकारची चिंता शेतकऱ्याच्या मनात सोयाबीनच्या पिकाबद्दल झाली आहे.
मागील वर्षी परतीचा पाऊस लांबल्याने त्याचा विपरित परिणाम सोयाबीन पिकावर झाला. काढणीला आलेले सोयाबीनचे पीक जास्त दिवस पावसाच्या पाण्यात भिजून काही भाग बुरशीयुक्त होऊन खराब झाला होता. आपल्या घरचेच सोयाबीन बियाणांची लागवड करावी, असे कृषी विभागानेदेखील म्हटले होते.
शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन १०० बिया पेरून पाहल्या त्यापैकी ४० ते ५० बिया उगवल्याचे शेतकऱ्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे घरचे सोयाबीनचे बियाणे कितपत उगवते याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. बियाणे उत्पादन करणाऱ्या सिड्स कंपन्यांचे अहवाल फारसे समाधानकारक नसल्याने बाजारामधून आणलेल्या बियाणे खरेदीसंबधीही शेतकऱ्यांचा फारसा विश्वास राहिला नसल्याने आपल्याकडीलच बियाणे पेरणे पसंत केले आहे.
परिसरात चांगला पाऊस न झाल्याने पेरलेले सोयाबीनचे दाणे उगवतील की नाही? याची धास्ती शेतकऱ्यांत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस.तौर यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी चांगली ओल झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. (वार्ताहर)
घरची बियाणे
यावर्षी बाजारपेठेत सोयाबीनचे बियाणे फारसे उपलब्ध झाले नाही. कृषि विभागानेही घरची बियाणे वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी ती वापरली. त्यातच पावसानेही दडी मारली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.