फ्रेन्डशीप क्लब म्हणजे लूटीचा ‘बाजार’ं

By Admin | Updated: May 3, 2015 00:59 IST2015-05-03T00:53:28+5:302015-05-03T00:59:12+5:30

सितम सोनवणे, लातूर महिला, मुलींसोबत मैत्री करा, मिटींग करुन रोज हजारो कमवा, अशा जाहिरातीला भुलून पैसे भरुन लातुरातील अनेकजण गंडवले गेले आहेत.

Friendship club is the 'market' of the looters | फ्रेन्डशीप क्लब म्हणजे लूटीचा ‘बाजार’ं

फ्रेन्डशीप क्लब म्हणजे लूटीचा ‘बाजार’ं


सितम सोनवणे, लातूर
महिला, मुलींसोबत मैत्री करा, मिटींग करुन रोज हजारो कमवा, अशा जाहिरातीला भुलून पैसे भरुन लातुरातील अनेकजण गंडवले गेले आहेत. अशा क्लबच्या नावाखाली भावनाशील तरुणाईला लुटणाऱ्या अक्षरश: टोळ्या कार्यरत आहेत. लातुरातील आणखी तरुण अशा प्रलोभनाला भुलून फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली मैत्रीचा बाजार मांडून अनेकांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीची शिकार बनता कामा नये म्हणून ‘लोकमत’टीमने याचे स्टिंग आॅपरेशन करुन केलेला पर्दाफाश. सोबत तरुणाईला ‘लोकमत’चे आवाहनही की अशा अनिष्ठ बाबीला भुलू नका.
या फ्रेंडशिप क्लबच्या प्रकरणात लातुरातील अनेकांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. पण अडचण अशी आहे की कुणीच तक्रार करायला धजावत नाही. कारण ‘हाईप्रोफाईल, महिला आणि मुलींशी आम्हाला फ्रेंडशिप करायची होती’ हे बदनामी होईल या भितीने सांगणे कठीण होऊन बसते आहे. लातूर शहरातील विविध महाविद्यालयातील मुले याला बळी पडली आहेत. वसतिगृहांनी याच्या चर्चा चवीने चर्चिल्या गेल्या. एक शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकारी, नुकताच प्रशासनात लागलेला एकटा राहणारा तरुण, एक वकील अशी लांबलचक यादी आहे. फसवणूक झाल्याची जिल्ह्यात एकही तक्रार पोलिसात दाखल झाली नाही़ बदनामीमुळे सारे गप्प आहेत़ मात्र याबाबत ‘लोकमत’कडे तक्रार करण्याचे धाडस एकाने केले आणि ‘लोकमत’ने ही बाब चव्हाट्यावर आणायचे ठरवून हे स्टिंग आॅपरेशन केले़
प्रतिनिधी : मॅडम लातूरहून बोलतोय़़़
संवादिका : हां, बोला़़़
प्रतिनिधी : मला आपल्या मैत्री क्लबच मेंबर व्हायचयं
संवादिका : मैत्री क्लबच मेंबर होऊन एन्जॉयमेंट करायचीय की पैसा कमवायचं ? पैसे कमवायचं असल्यास मॅडमचे मिस्टर बाहेरगावी गेल्यास त्यांच्यासोबत एन्जॉयमेंट करुन झाले की, मॅडम १० हजार देतील त्यातील ३ हजार आमचं कमिशन असेल, ७ हजार तुमच्यासाठी असतील, यासाठी अडीच हजार रुपये तुम्हाला बँकेत भरावे लागतील़
प्रतिनिधी : (दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर) मॅडम दोनच हजार रुपये जमा झालेत, ५०० रुपये नाहीत़
संवादिका : ठिक आहे़ २ हजार रुपये बँकेत भरा, ५०० रुपये तुमची मिटींग झाल्यानंतर जमा करा़ बँकेत जाताच मला कॉल करा, अकाऊंट नंबर सांगते़
प्रतिनिधी : (बँकेजवळ जावून) मॅडम मी बँकेत आलोय़
संवादिका : ठिक आहे़ अकाऊंट नंबर घ्या, ६०६९१०३१०००३१०९ बँक आॅफ इंडियाच्या कुठल्याही शाखेतून पैसे भरा. प्रतिनिधी : मॅडम, तुम्ही सांगितलेल्या अकाऊंटवर पैसे जमा केले़ (या अकाऊंट बद्दल बँक अधिकाऱ्याला माहिती विचारली असता, हे अकाऊंट आकाश गर्ग यांच्या नावावर असून, उत्तम नगर, नवीन दिल्ली असा पत्ता सांगितला गेला)
प्रतिनिधी : हां नमस्कार मॅडम.
महिला : नमस्कार. तुम्ही पैसे भरला नाहीत ?
प्रतिनिधी : नाही मॅडम बँकेत जाईपर्यंत बँक बंद झाली.
महिला : मग एम. पेसाच्या मिनिस्टोअरमधून चार हजार रुपयांचं चोक-अप करायचं.
प्रतिनिधी : मला माहित नव्हतं मॅडम ? ते कसं करायचं ?
महिला : बस स्टँडसमोर आहेत़ नंदी स्टॉपला आहेत़ अशोक हॉटेल आहे ना, त्याच्या बाजूलाही मिनीस्टोअर आहे व्होडाफोनचे़ कुठेही प्रत्येक ठिकाणी आहे़ रिचार्जवाल्यांकडं असतं़ मिनीस्टोअरमध्ये असतं़ त्यांना सांगा ४ हजार रुपयांचं चोक-अप करा एम-पेसाने़ ते पण बँक अकाऊंटला जातंय़ उद्या बँक बंद आहे़ उद्यापण तुमचं काम रद्द होईल, म्हणून म्हणायले़़़
प्रतिनिधी : मी उद्या स्टोअरजवळ गेल्यानंतर फोन करतो़ मग मला प्रोसेस सांगा, कसं करायचे ते़ उद्या करुयात दुपारपर्यंत़ मला दोन्ही पॅकेज अजून एकदा समजून सांगता का?
महिला : हो़ एन्जॉयचं एक आणि दुसरं इन्कमचं़ ३ हजार रुपये एकदाच भरले की फ्री एन्जॉयमेंट ६ महिन्यासाठी राहणाऱ देणंघेणं काही नाही़ इन्कम काही नाही़ एन्जॉयमेंटसोबत इन्कम पाहिजे असल्यास २२५० रुपये़ ३ हजार रुपये भरल्यास कॉलेजगर्ल, मॉडेल देवू़ फ्री एन्जॉयमेंट राहील ६ महिन्यापर्यंत़़़
प्रतिनिधी : त्यांना काही द्यावं लागतं का?
समन्वयिका : नाही़ नाही़़़ पैसे भरले की १०-१५ मिनिटात़ आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर देऊ. कारण की त्याचं कमिशन-बिमिशान काही नसतं आमचं़ ठीक आहे?
प्रतिनिधी : त्यांना पुन्हा कधी भेटता येईल ?
समन्वयिका :ते त्यांच्या मनावऱ तुम्ही त्यांना कधीही भेटू शकता.
प्रतिनिधी : मैत्रीचा मेंबर बदलूनही मिळेल का?
समन्वयिका : हो, हो !
प्रतिनिधी : मी उद्याच उर्वरीत पैैसे भरतो तुमचे़़़
समन्वयिका : हो, हो चालेल़़़

प्रतिनिधी : पिंकी मॅडम, पुनम मॅडम ५ हजार रुपये मागतात़
संवादिका : मी मॅडमशी बोलून तुम्हाला फोन करते़
प्रतिनिधी : हां मॅडम, काय झाल़
संवादिका : मागच्या वेळी जरा प्रॉब्लेम झाला होता़ त्यामुळे त्या ५ हजार मागतात़ ते पण कंपनीच्या अकाऊंटला जमा करा़ प्रतिनिधी : मॅडम, पैसे नाहीत, कसे करु़
संवादिका : व्याजानी घ्या, दोन तासाचा तरी प्रश्न आहे़ दोन तासानंतर तुम्ही १५ हजार कमवणार आहात़
प्रतिनिधी : मॅडम कसं शक्य आहे, ५०० रुपयाचा डिस्काऊंट मागितला होता़ आणि आज बँकाही बंद आहेत़
संवादिका : लातुरात मनी ट्रान्सफरच्या सुविधा कुठे आहेत ते बघून मला फोन करा़ तुमच्यासाठी आजच मिटींग फिक्स करते़
प्रतिनिधी : (एक दिवसानंतर) मॅडम, तीनच हजार रुपये जमा झालेत, काय करु़संवादिका : ठिक आहे, मी तुम्हाला मदत करते़ माझ्याकडे २ हजार आहेत़ तुम्ही ३ हजार अकाऊंटला जमा करा, पुनम मॅडमला ५ हजार भरल्याचे सांगा़ किती लवकर भराल बँकेत, आज शनिवार आहे, १२़३० पर्यंतच बँका चालू असतात़
प्रतिनिधी : ठिक आहे मॅडम १२ पर्यंत भरतो़ पण पुनम मॅडम अजून पैसे तर मागणार नाहीत ना. संवादिका : (लाडीक हसून) नाही नाही. तुम्ही आधी तेवढे भरा. ओ. के.

Web Title: Friendship club is the 'market' of the looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.