छत्रपती संभाजीनगर : दारू आणण्यासाठी बाहेर जाऊन घरी परतल्यावर मित्राला मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने संताप अनावर झालेल्या मित्राने मित्राचीच दांड्याने डोके ठेचून हत्या केली. विशाल बंडू पाचकोर (३२, रा. काबरानगर) असे मृताचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी मारेकरी सुधाकर शेषराव ढेपे (४८, रा. काबरानगर) याच्यासह एक अल्पवयीन मुलगा व मैत्रिणीला ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी सांगितले.
मूळ हिंगोलीचा असलेला विशाल शहरात काम करत होता. यातून त्याची तीन वर्षांपूर्वी रंगकाम करणाऱ्या सुधाकरसोबत ओळख झाली. सुधाकर एकटा राहतो. सोमवारी रात्री सुधाकर व त्याची प्रेयसी त्याच्या घरी सोबत होते. ११ वाजेच्या सुमारास विशाल त्यांच्या घरी गेला. त्यादरम्यान सुधाकर दारू आणण्यासाठी बाहेर गेला. १ वाजेच्या सुमारास घरी पोहोचल्यावर विशाल व सुधाकरची प्रेयसी सुधाकरला आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. त्यातून भांडण विकोपाला जात त्याने घरातील लाकडी दांडक्याने त्याच्या डोके, छातीवर मारले. विशाल गंभीर जखमी झाला. त्याचा श्वास बंद झाल्यानंतर सुधाकरने एका अल्पवयीन मुलाला बोलावून मैत्रिणीच्या मदतीने विशालला रस्त्यावर ओढत नेऊन टाकून दिले.
पोलिसांना अपघाताचा कॉलमध्यरात्री २ वाजता रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत तरुण आढळल्याने स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्याला घाटी रुग्णालयात नेले. जवाहरनगर पोलिसांना अपघाती मृत्यूचा कॉल आला. मात्र, प्राथमिक पाहणीत अंगावर जखमा असल्याने संशय बळावला. सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, जवाहरनगरचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी घाटीत धाव घेतली. डॉक्टरांनी डोक्यात गंभीर जखमा असल्याचे सांगितले.
सीसीटीव्हीमध्ये दिसलेत्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात रात्री २ वाजेच्या सुमारास तिघे जण मृतदेह रस्त्याने ओढताना दिसले. त्यातील एक व्यक्ती सुधाकर असल्याचे कळाले. पोलिसांनी तत्काळ सुधाकरचे घर गाठले. तेव्हा तो, त्याची मैत्रीण घरातच होते. बारकाईने पाहिल्यावर फरशी पुसलेली होती. मात्र, फरशीवर रक्ताचे डाग आढळले. रक्त पुसलेला कपडाही सापडला. त्यांना तत्काळ ताब्यात घेत ठाण्यात नेण्यात आले. चौकशीत दोघांनी त्यांच्या कृत्याचा पाढा वाचला व हत्येचा उलगडा झाला.
पोलिसच झाले फिर्यादीविशाल एकटाच शहरात राहत होता. मृत्यूनंतर त्याचा मोबाइलदेखील सापडला नाही. परिणामी, ओळख पटल्यानंतरही पोलिसांचा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क होईना. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सरकारतर्फे फिर्यादी होत अंमलदार विनोद बनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा विशालचे नातेवाईक शहरात आले.
Web Summary : Enraged, a man in Sambhajinagar bludgeoned his friend to death after finding him with his girlfriend. The body was dumped on the road. Police arrested the killer, his girlfriend, and a minor accomplice.
Web Summary : संभाजीनगर में एक व्यक्ति ने अपने दोस्त को अपनी गर्लफ्रेंड के साथ देखकर गुस्से में उसकी हत्या कर दी। लाश को सड़क पर फेंक दिया गया। पुलिस ने हत्यारे, उसकी गर्लफ्रेंड और एक नाबालिग को गिरफ्तार किया।