मित्रानेच काढला मित्राचा काटा

By Admin | Updated: September 7, 2016 00:38 IST2016-09-07T00:08:33+5:302016-09-07T00:38:01+5:30

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजनगरातील मनोज अशोक गवळी या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले.

Friend's friend removed | मित्रानेच काढला मित्राचा काटा

मित्रानेच काढला मित्राचा काटा


औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजनगरातील मनोज अशोक गवळी या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले. सोबतच पाणी जार वाटप करणाऱ्या मित्रानेच मनोजचा खून के ल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहोचले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश वायाळ (२२, रा. राजनगर) या संशयिताला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. चोरीच्या उद्देशाने आरोपी ऋषिकेश वायाळने मनोजचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, असे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी
सांगितले.
मनोजचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासात अखेर वायाळने हा खून केल्याचे समोर आले.
आरोपी वायाळ आणि मनोज हे दोघेही सोबतच पाणी जार वाटप करण्याचे काम करीत होते. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी वायाळ दिवसभर मनोजसोबतच होता.
शनिवारी मनोज घरी एकटाच होता वायाळ झोपण्यासाठी त्याच्या घरी गेला. व्हाईटनरच्या नशेत असलेल्या वायाळने रात्री मनोजच्याच घरात पैसे चोरण्याचा प्रयत्न
केला.
अचानक मनोज झोपेतून उठला. आपला मित्र घरात चोरी करीत असल्याचे नजरेस पडताच मनोजने त्याला जाब विचारला असता वायाळने त्याचा गळा दाबला आणि बाजूला पडलेला दगड उचलून मनोजचे डोके ठेचले. तो गतप्राण होताच त्याने तेथून धूम ठोकली. आरोपीने खुद्द असा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

Web Title: Friend's friend removed