शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडीट कार्ड अपग्रेडच्या नावाखाली वारंवार विचारला ओटीपी; थोड्यावेळात समजले सव्वालाख गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:50 IST

तब्बल सात वेळा ओटीपी विचारून सायबर भामट्याने हातोहात ही रक्कम लांबवली.

कन्नड ( औरंगाबाद): तुमचे क्रेडिट कार्ड जुने झाले असून ते अपग्रेड करण्यासाठी ओटीपी सांगा अशी थाप मारून सायबर भामट्याने तब्बल १ लाख ३६ हजार ९३५ रुपयांची रक्कम ऑनलाईन लंपास केली. तब्बल सात वेळा ओटीपी विचारून भामट्याने हातोहात ही रक्कम लांबवली. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सायबर क्राईमने तक्रार कन्नड शहर पोलीस ठाण्यात वर्ग केली. शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि राजीव तळेकर पुढील तपास करीत आहेत.

शहरातील दत्त कॉलनीतील  कृष्णा एकनाथ बोडखे हे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गराडा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नौकरीस आहे. त्यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी सुमारे साडेसात  वाजता शिक्षक कृष्णा बोडखे यांना त्यांच्या मोबाईलवर हिंदी भाषिकाचा फोन आला. मी एसबीआय क्रेडीट कार्डच्या ऑफिसवरून बोलतो  तुमचे क्रेडिट कार्ड जुने झाले आहे. सदर कार्ड हे सुरक्षिततेसाठी अपग्रेड करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्डची माहीती द्यावी लागेल. त्यानुसार शिक्षक कृष्णा बोडखे यांनी त्याला क्रेडीट कार्ड क्रमांक व जन्म तारीख सांगितली. त्यानंतर तुमची कार्ड लिमीट ब्लॉक करावी लागेल त्याच्यासाठी तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवत असल्याचे त्याने सांगितले.  त्यानंतर बोडखे यांनी त्यांना आलेला     ओटीपी सांगितला. 

मात्र, ओटीपी मॅच होत नाही असे सांगून पुन्हा पुन्हा ओटीपी सांगितला तोही मॅच झाला नसल्याचे त्याने सांगितले. असे एकूण सात वेळा ओटीपी पाठवले.  त्यानंतर त्याने सांगितले की, तुमचे कार्ड लिमीट ब्लॉक झाले आहे. चोवीस तासानंतर तुमच्या एसबीआय कार्ड लॉग इनला रिफ्रेश होईल असे सांगितले. त्यानंतर तुमच्या पत्त्यावर नवीन क्रेडिट कार्ड येवून जाईल असे म्हणून त्याने फोन कट केला. शिक्षक कृष्णा बोडखे यांच्या मोबाईलवर रुपये ९९ हजार ९३५, १२ हजार व ५ हजार रु चे ५ वेळा असे एकूण ७  वेळा व्यवहार झाल्याचे संदेश आले. एकूण १ लाख ३६ हजार ९३५ रुपयांची फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी