फुकट्या प्रवाशांत दहशत
By Admin | Updated: October 2, 2014 00:50 IST2014-10-02T00:36:50+5:302014-10-02T00:50:29+5:30
औरंगाबाद : वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून रेल्वेत अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

फुकट्या प्रवाशांत दहशत
औरंगाबाद : वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून रेल्वेत अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांतील कारवाईवरून पूर्णा, परभणी रेल्वेस्थानकात फुकट्या प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य मंडल अधिकारी नेहा रत्नाकर यांनी सांगितले.
मॉडेल रेल्वेस्थानकावर नेहा रत्नाकर यांनी मंगळवारी स्थानकाला भेट दिली. याशिवाय त्यांनी विविध रेल्वेगाड्या आणि स्थानकावर प्रवाशांकडे तिकीट तपासणी केली. यावेळी नांदेड विभागाचे ‘एसीएम’ कमलाकर बाबू, २१ तिकीट निरीक्षक, ५ आरपीएफ जवानांनी स्थानकात दिवसभर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे मंगळवारी अनेकांना विनातिकीट प्रवास चांगलाच महागात पडला. रात्री उशिरापर्यंत विविध रेल्वेंमध्ये आणि स्थानकांवर प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांकडून विविध रेल्वेस्थानकांवर अचानक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.