चालक गावाकडे गेल्याने मालवाहतूक व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:26+5:302021-04-08T04:05:26+5:30

संघटनेचे अध्यक्ष फैयाज खान यांनी सांगितले की, शहरातील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांकडे एक हजाराच्या जवळपास मालट्रक आहेत. त्यांत ७० ते ८० ...

Freight business in trouble as driver goes to village | चालक गावाकडे गेल्याने मालवाहतूक व्यवसाय अडचणीत

चालक गावाकडे गेल्याने मालवाहतूक व्यवसाय अडचणीत

संघटनेचे अध्यक्ष फैयाज खान यांनी सांगितले की, शहरातील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांकडे एक हजाराच्या जवळपास मालट्रक आहेत. त्यांत ७० ते ८० टक्के चालक मराठवाड्यातील ग्रामीण भागातील आहेत; तर उर्वरित २० टक्के चालक हे हरियाणा व उत्तर प्रदेशातील आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने व ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावल्याने २५०० चालक गाड्या लावून त्यांच्या गावाकडे गेले आहेत. तसेच होळीसाठी हरियाणा व उत्तरप्रदेशात जे आपल्या गावाकडे गेले ते अजून परतलेले नाहीत. यामुळे २५ ते ३० टक्के मालट्रक जागेवरच उभे आहेत. तसेच कोरोना संसर्ग, लॉकडाऊन व काही राज्यांत निवडणुका यांमुळे औद्योगिक वसाहतींत कच्च्या मालाची आवक व पक्क्या मालाच्या जावकेवर १५ टक्के परिणाम झाला आहे. हे मालट्रकांच्या मागणीवरून लक्षात येत आहे. लवकरात लवकर लॉकडाऊन रद्द केले तरच गावाकडे गेलेले चालक परत शहरात येतील. यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन रद्द करावे, अशी मागणी मालवाहतूकदार संघटनेने केली आहे.

Web Title: Freight business in trouble as driver goes to village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.