सारणी येथे विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रीस्टाईल’; एक जखमी
By Admin | Updated: March 12, 2017 23:19 IST2017-03-12T23:17:40+5:302017-03-12T23:19:53+5:30
केज : तालुक्यातील सारणी येथे बारावी परीक्षेत बाकड्यावर बसण्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये शनिवारी फ्रीस्टाईल हाणामारी झाली.

सारणी येथे विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रीस्टाईल’; एक जखमी
केज : तालुक्यातील सारणी येथे बारावी परीक्षेत बाकड्यावर बसण्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये शनिवारी फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यात एकजण जखमी झाला.
विकास प्रभू गुरव (रा.सारणी) असे जखमीचे नाव आहे. विठ्ठल विद्यालयात बारावी परीक्षेत विकास गुरव व सिद्धार्थ सोनवणे यांचा परीक्षा क्रमांक चिकटून होता.
जवळ बसू न दिल्याने विकासला सिद्धार्थ सोनवणे, आशुतोष सोनवणे, सनी सोनवणे व अन्य एकाने मारहाण केली. याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)