शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सिडकोतील लीजहोल्डचे फ्रीहोल्ड कागदावरच; महिनाभराची घोषणा हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:06 IST

सिडकोतील भाडेकरारावर (लीजहोल्ड) असलेल्या मालमत्ता फ्रीहोल्ड (मालकीहक्क) महिनाभरात होईल, यासाठी सिडको संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी घोषणा जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आली होती.

औरंगाबाद : सिडकोतील भाडेकरारावर (लीजहोल्ड) असलेल्या मालमत्ता फ्रीहोल्ड (मालकीहक्क) महिनाभरात होईल, यासाठी सिडको संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी घोषणा जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आली होती. मार्च महिना संपत आला आहे; परंतु त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. शिवसेना-भाजपच्या राजकारणात सिडकोतील नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरूअसल्याचे यातून दिसते आहे. 

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यासोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जानेवारी महिन्यात बैठक घेतली. शिवसेना आणि भाजपमध्ये सिडकोवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. मात्र, सिडको संचालक मंडळाच्या निर्णयानंतरच ३५ हजार मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार आहे. शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष असून सध्या तरी सेना-भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. या सगळ्या मागण्यांचे काय 

सिडकोतील मालमत्ता लीजहोल्डवरून फ्रीहोल्ड केव्हा होणार. सिडको आकारत असलेल्या ३८ हजार रुपयांच्या शुल्कावर जीएसटी लागणे कधी थांबणार, नो ड्यूज ओन्ली नो आॅब्जेक्शन याबाबत नागरिकांना होणारा त्रास केव्हा थांबणार, सर्व मालमत्तांच्या संचिका मनपाकडे वर्ग करण्याबाबत कधी निर्णय होणार, पुनर्विकासासाठी एनओसी देण्यास कधीपासून सुरुवात होणार, धार्मिक स्थळे नाममात्र दराने नियमित करण्याबाबत सकारात्मक विचार कधी होणार. सिडको-हडकोमध्ये २२ ते २४ वॉर्ड येतात. ५० हजारांच्या आसपास मालमत्ता त्या भागात आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपचे त्या वॉर्डांवर वर्चस्व आहे. राज्यात युती सरकार असल्यामुळे किमान यावेळी तरी सिडकोवासीयांचे प्रलंबित प्रश्न सुटतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे; परंतु राजकारणासाठीच सिडकोवासीयांच्या समस्यांचा वापर होत असल्याचे दिसते. 

सगळा राजकीय खेळ सिडकोतील नागरी समस्यांवर मागील सहा महिन्यांत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्य प्रशासकांना भेटले की, भाजपचे शिष्टमंडळही भेटून निवेदन देते. शिवसेनेने मुंबईत व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली की, भाजप मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करते. या सगळ्या राजकीय खेळात सिडकोचे प्रश्न तसेच असल्याचे दिसते आहे.

मुख्य प्रशासकांचे मत असेमुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, याबाबत मुख्यालयातच निर्णय होणार आहे. आमच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे. मुख्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव गेला की नाही, याबाबत मला सांगता येणार नाही. 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादAurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजनShiv SenaशिवसेनाBJPभाजपा