जनजागृतीअभावी शिबिराचा फज्जा
By Admin | Updated: September 16, 2014 01:30 IST2014-09-16T00:33:36+5:302014-09-16T01:30:54+5:30
तळणी: मंठा तालुक्यातील तळणी येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियान सन २०१४ अंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.

जनजागृतीअभावी शिबिराचा फज्जा
तळणी: मंठा तालुक्यातील तळणी येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियान सन २०१४ अंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिराची कोणतीच पूर्वकल्पना ग्रामस्थांना नसल्याने क ोणीच फि रक ले नाही. केवळ जनजागृती अभावी या शिबिराचा फ ज्जा उडाला आहे.
महाराष्ट्र शासनाने महसूल विभागामार्फ त प्रत्येक महसूल मंडळात महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांपासून सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत विस्तारीत समाधान योजनेचे शिबीर घेण्यात आले. तालुक्यातील सर्व विभागाच्या योजनेची माहिती व त्या विभागाकडे असलेल्या जनतेच्या प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना या शिबिराच्या मागे होती. मात्र, या कार्यक्रमाची गावात कोणतीच दवंडी किंवा पूर्व कल्पना ग्रामस्थांना नव्हती. शुक्रवारी ग्रामपंचायत क ार्यालयात क ोणीच फिरकले नाही. मंडळ अधिक ारी अनिल पुरी हे ग्रामपंचायत क ार्यालयात आले असता कोणीच हजर नव्हते. ग्रामस्थांना या क ार्यक्र माची क ोणतीच पूर्व क ल्पना नसल्याने क ोणीच फि फिरकले नाही. केवळ जनजागृती अभावी शिबिराचा फज्जा उडाला आहे. या शिबिरात महसूल विभाग - ८ अ चे वाचन, आम आदमी अर्ज स्वीकृती क रणे, कृ षी विभाग - कृ षी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणे, आरोग्य विभाग - आरोग्य तपासणी, रक्त गट तपासणी, पं. स.कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणे, पशु वैद्यकीय विभाग - पशु आरोग्य तपासणी व लसीकरण करणे, गट शिक्षण विभाग - शिक्षण विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणे, महिला व बालविकास विभाग - महिला व बालक ल्याण विभागाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येणार होती. शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामस्थ माहितीपासून वंचित राहिले. (वार्ताहर)